नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरात हाहाःकार उडाला असताना ऑक्सिजन, रेमडेसिवीर, कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असताना सर्वोच्च न्यायालयाने विविध याचिकांवर सुनावणी करताना महत्त्वाचे निर्देश दिले. याचा उपयोग सर्वसामान्यांना झाला. याच पार्श्वभूमीवर केरळमध्ये असलेल्या त्रिशूर येथे पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलींने थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना पत्र लिहिले आहे. केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या मुलीचे नाव लिडविना जोसेफ असे आहे. (thank you your honour class 5 girl wrote to cji Ramana over corona and gets reply)
लिडविना जोसेफने थेट सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना पत्र लिहून त्यासोबत एक चित्र जोडले आहे. यामध्ये एक न्यायाधीश करोनावर हल्ला करतांना दाखवले आहेत. या मुलीला सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्याकडून उत्तर देखील मिळाले आहे. तिच्या सुंदर पत्रानिमित्त सरन्यायाधीशांनी या लहानगीला शुभेच्छा देऊन तिला एक पत्र लिहिले.
“भले लोकांचा तडफडून जीव जाऊ दे, पण नरेंद्र मोदींची महानता कायम राहिली पाहिजे”
मला आनंद आणि अभिमान वाटतो
दिल्ली आणि देशाच्या इतर भागात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबद्दल मला फार काळजी होती. मला वृत्तपत्रातून कळले की, कोविड- १९ विरुद्ध सामान्य लोकांच्या दु: ख आणि मृत्यूबद्दलच्या लढ्यात माननीय न्यायालयाने प्रभावीपणे हस्तक्षेप केला आहे. आदरणीय कोर्टाने ऑक्सिजनपुरवठा करण्याचे आदेश दिले आणि बर्याच लोकांचे जीव वाचवले. मला समजते की माननीय न्यायालयाने आपल्या देशात खासकरुन दिल्लीत कोविड -१९ आणि मृत्यु दर कमी करण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत. मी याबद्दल धन्यवाद देते. आता मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो, असे लिडविना जोसेफने आपल्या पत्रात म्हटले आहे.
केंद्र सरकार आणखी १० कंपन्यांची करणार विक्री; निर्गुंतवणूक समिती गठीत
सरन्यायाधीशांनी काय उत्तर दिले?
सरन्यायाधीश रमणा यांनी उत्तरादाखल पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, मला आपले सुंदर पत्र प्राप्त झाले आहे आणि यामध्ये एका श्रमजीवी न्यायाधीशांचे हृदयस्पर्शी चित्र आहे. देशातील घडामोडींवर आणि देशभर आजार उद्भवल्यानंतर आपण लोकांच्या आरोग्यासाठी जी काळजी दाखविली आहे त्याकडे आपण लक्ष ठेवले आहे, याबद्दल खरोखर प्रभावित झालो आहे. मला खात्री आहे की आपण जागरूक, जागरूक आणि जबाबदार नागरिक व्हाल, जे राष्ट्र उभारणीत मोठे योगदान देईल, असे रमणा यांनी शुभेच्छा देत म्हटले आहे.