ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - देशोदेशींच्या राष्ट्रप्रमुखांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची असणारी मैत्रीपूर्ण जवळीक हा चर्चेचा विषय आहे आणि एका चांगल्या मित्राप्रमाणे पंतप्रधान मोदी त्यांना वाढदिवस वा विशेष प्रसंगांनिमित्त शुभेच्छाही देत असतात. त्याचप्रमाणे मोदींनी शुक्रवारी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि पुन्हा चर्चा सुरू झाली. त्याचं कारण म्हणजे मुळात काल घनी यांचा वाढदिवसच नव्हता. मोदींनी ट्विटरवरून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ख-या, मात्र घनी यांनी आपला वादविस आज नसल्याचे स्पष्ट केले. ' मोदीजी, तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद, पण माझा वाढदिवस आज नव्हे तर १९ मे रोजी असतो' असे ट्विट घनी यांनी केले. घनी यांच्या उत्तरानंतर या मजेशीर प्रकाराची ट्विटर युझर्समध्ये चांगलीच चर्चा रंगली आणि पंतप्रधान मोदींनी कोणत्या सूत्रांच्या आधारे घनी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, हे सिद्ध करण्यासाठी ट्विटवर चढाओढही सुरु झाली. अनेकांनी त्यांना डेटाबेस अपडेट करण्याचाही सल्ला दिला.
Happy birthday @ashrafghani. Praying for your long life & exceptional health and a joyful journey ahead.— Narendra Modi (@narendramodi) February 12, 2016