'देशाचा अपमान करणाऱ्या थरूर यांना काँग्रेसनं बडतर्फ करावं'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 04:02 AM2018-10-30T04:02:54+5:302018-10-30T04:03:43+5:30

काँग्रेसचे खासदार शशी थरून यांनी संपूर्ण देशाचा अपमान केल्यामुळे त्यांना पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काढून टाकावे, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली.

Tharoor to insult the country, make Congress big-hearted | 'देशाचा अपमान करणाऱ्या थरूर यांना काँग्रेसनं बडतर्फ करावं'

'देशाचा अपमान करणाऱ्या थरूर यांना काँग्रेसनं बडतर्फ करावं'

googlenewsNext

इंदूर : काँग्रेसचे खासदार शशी थरून यांनी संपूर्ण देशाचा अपमान केल्यामुळे त्यांना पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काढून टाकावे, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली.

सत्तेसाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हिंदुत्वाची शाल पांघरूण हिंदूंना संभ्रमात टाकत आहेत, तर थरूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महादेवाच्या पिंडीवरील विंचवाची उपमा देत आहेत आणि राहुल गांधी महाकालच्या पूजेसाठी मंदिरात जातात; परंतु महाकाल तुम्हाला व तुमच्या पक्षाला क्षमा करणार नाही, असे पात्रा यांनी म्हटले. पात्रा सोमवारी येथे पत्रकारांशी बोलत होते. हिंदूंचा द्वेष करणारे थरूर यांचे हे ताजे वक्तव्य हे काही पहिलेच नाही. यापूर्वी, त्यांनी भारताला पाकिस्तानचा नव्हे तर हिंदू पाकिस्तान व हिंदू तालिबानपासून धोका आहे, असे म्हटले होते. त्यांच्यासाठी राम काल्पनिक व दंतकथा असून आता मात्र हेच हिंदूंना आपलेसे करण्यासाठी मंदिरांवर डोके टेकवत आहेत, असे पात्रा म्हणाले.

...तर त्यांनी न्यायालयात जावे
काँग्रेसचे नेते हिंदूंच्या भावना व त्यांच्या देवतांवर भाष्य करतात. याच पद्धतीने ते इतर धर्मांबद्दल बोलू शकतात का? २०१४ तील पराभवानंतर काँग्रेस हिंदू हिंदू करीत आहे, असे पात्रा म्हणाले.
राफेल विमानप्रकरणी राहुल गांधी नापास झाल्याचे सांगून पात्रा म्हणाले की, जर त्यांच्याकडे पुरावे आहेत तर त्यांनी न्यायालयात जावे. राफेल म्हणजे राहुल गांधी फेल. २०१९ मध्ये ३०० पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा केंद्रात मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल, असेही ते म्हणाले.

Web Title: Tharoor to insult the country, make Congress big-hearted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.