भोपाळ : नरसिंगपूरमधील एका अपंग तरुणीला हात नसल्याने तिच्या पायाच्या अंगठ्यावर शाई लावण्यात आली. तसेच मतदानावेळी तिच्या पसंतीच्या उमेदवाराचे बटन दाबण्यासाठी पायाने बटन दाबणार असल्याने तोल सावरण्यासाठी मदतनीसाची सोय करण्यात आली होती.
लोकसभेच्या सात राज्यांमधील ५१ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. हा पाचवा टप्पा असून अजून दोन टप्पे बाकी आहेत. या निवडणुकीदरम्यान काही ठिकाणी पोटनिवडणुकाही घेतल्या जात आहेत. अशावेळी डाव्या हाताच्या तर्जनीवर लोकसभेची शाई आणि उजव्या हाताच्या तर्जनीवर पोटनिवडणुकीची किंवा अन्य निवडणुकीची शाई लावण्यात येते. मात्र, अपंग असल्यास काय, असा प्रश्न पडला असेल तर अपंग व्यक्तीला दोन्ही हात नसल्यास त्या व्यक्तीच्या उजव्या किंवा डाव्या वरीलप्रमाणे अंगठ्यावर शाई लावण्यात येते.
नरसिंगपूरमधेही एक अपंग तरुणी निधी ही मतदान करण्यासाठी आली होती. यावेळी तिच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर मतदान केल्याची शाई लावण्यात आली. महत्वाचे म्हणजे तिने पायाच्या बोटांनी उमेदवाराला मतदान केले.