शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

बँक घोटाळ्यातील रक्कम वसूल करणार; तक्रारीला विलंब नाही, SBI चं म्हणणं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 8:22 AM

एबीजी शिपयार्ड लिमिटेड २००१ पासून सुमारे २८ बँकांकडून कर्ज घेत होते. मात्र, कंपनी दीर्घकाळ यशस्वीपणे काम करू शकली नाही.

नवी दिल्ली : एबीजी शिपयार्ड लिमिटेडने केलेल्या बँकेच्या सर्वात मोठ्या घोटाळ्यामुळे बँकांच्या ताळेबंदावर कोणताही परिणाम होणार नाही. त्याच वेळी, आम्ही शक्य तितकी रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करू, असे एसबीआयने म्हटले आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या नेतृत्वाखाली २ डझनहून अधिक लोकांना कन्सोर्टियम व्यवस्थेअंतर्गत कर्ज देण्यात आले होते. खराब कामगिरीमुळे नोव्हेंबर २०१३ मध्येच कंपनीचे खाते एनपीए झाले. कंपनीचे पुनरुज्जीवन करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यामध्ये यश आले नाही, असे एसबीआयने म्हटले.

एबीजी शिपयार्ड लिमिटेड २००१ पासून सुमारे २८ बँकांकडून कर्ज घेत होते. मात्र, कंपनी दीर्घकाळ यशस्वीपणे काम करू शकली नाही. देशातील सर्वात मोठी बँक म्हणून एसबीआयला अन्य बँकांकडून तक्रार दाखल करण्यासाठी अधिकृत करण्यात आले. सर्वात पहिली तक्रार नोव्हेंबर २०१९ मध्ये दाखल करण्यात आली होती. २०२१ मध्ये एक सर्वसमावेशक तक्रार दाखल करण्यात आली. यामध्ये बँकांकडून कोणताही उशीर झालेला नाही. शिपयार्ड २०१३ पासून तोट्यात आहे, असे बँकेने म्हटले आहे.

मोदींच्या कार्यकाळात ५ लाख ३५ हजार कोटींची बँक फसवणूक : राहुल गांधी

एबीजी शिपयार्ड प्रकरणावरून सर्व बाजूंनी सरकारवर टीका होत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदींच्या काळात आतापर्यंत ५ लाख ३५ हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक झालेली आहे. ७५ वर्षांमध्ये भारतातील जनतेच्या पैशाची एवढी फसवणूक झालेली नाही. लूट आणि फसवेगिरीचे हे दिवस फक्त मोदी मित्रांसाठी ‘अच्छे दिन’ आहेत, असे राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.

टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया