नवी दिल्ली : २००२ मधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि कुटुंबातील सात सदस्यांच्या हत्याप्रकरणातील ११ दोषींच्या शिक्षा माफीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वाेच्च न्यायालयाने साेमवारी केंद्र व गुजरात राज्य सरकारांना नाेटीस जारी केली. गुजरात सरकारने ११ जणांना माफी दिल्याची फाईल पुढच्या सुनावणीच्या तारखेला सादर करावी, असे आदेश न्या. के. एम. जोसेफ व न्या. बी. व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठाने दिले.
या प्रकरणी न्यायालय भावनेच्या भरात वाहून न जाता कायद्याच्या कसाेटीवर याेग्य ताे निर्णय घेईल, असे मत सुनावणी दरम्यान खंडपीठाने व्यक्त केले. बानो यांनी दोषींच्या शिक्षा माफीला आव्हान दिले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी १८ एप्रिलला हाेईल. .बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची शिक्षा माफ करताना सरकारने कोणते निकष लावले आहेत हे न्यायालय तपासून पाहणार आहे. अनेक मुद्दे परस्परांत गुंतलेल्या या खटल्याची सविस्तर सुनावणी होईल.