- बलवंत तक्षकचंडीगड : हरयाणा व मध्य प्रदेशातील दोन पहिलवानांच्या प्रेमविवाहाचे प्रकरण पंजाब व हरयाणा हायकोर्टात गेले आहे. यातील मुस्लिम युवती मध्य प्रदेशातील भोपाळमधली, तर हिंदू युवक हरयाणाच्या चरखी दादरीमधील आहे.
युवतीच्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने हरयाणा सरकारकडून दाम्पत्याच्या सुरक्षेबाबतचा अहवाल मागविला आहे. तिने २७ वर्षीय युवकासोबतने मुस्लिम रीतीरिवाजाप्रमाणे विवाह केला आहे. ती युवावस्थेत असून, विवाहानंतर तिच्या कुटुंबीयांकडून त्रास दिला जात आहे, असे हायकोर्टापुढे सांगण्यात आले. तिचे कुटुंबीय विवाहाच्या विरोधात आहेत. ते दोघांना जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. हायकोर्टाने या प्रकरणात मुलीच्या भोपाळ येथील आई-वडिलांना नोटीस बजावून उत्तर मागविले आहे. या दोन्ही पहिलवानांची भेट सहा महिन्यांपूर्वी एका क्रीडा महोत्सवात झाली होती.