हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुख्खू यांची मध्यरात्रीच्या सुमारास अचानक प्रकृती बिघडली आहे. यामुळे त्यांना शिमल्यातील IGMC रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुख्खू यांच्या पोटात दुखू लागले होते.
मध्यरात्रीनंतर सुख्खू यांना रुग्णालयात आणण्यात आले आणि त्यानंतर येथे दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून काळजी करण्यासारखे काही नाही, असे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून किंवा काँग्रेसकडून अद्याप अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही. परंतू, रुग्णालयाती सुत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
रात्री उशिरा अडीचच्या सुमारास सुख्खू यांच्या पोटाच दुखू लागले होते. म्हणून त्यांना हॉस्पटलमध्ये नेण्यात आले. अल्ट्रासाउंडसह अन्य चाचण्या देखील करण्य़ात आल्या. यावेळी त्यांच्या पोटात सुजही असल्याचे दिसून आले. यामुळे त्यांना अॅडमिट करण्यात आले आहे. IGMC चे एमएस डॉ. राहुल राव यांनी सुख्खू यांच्या पोटात संसर्ग झाल्याचे म्हटले आहे.
त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या झाल्या असून अहवाल नॉर्मल आहेत. आम्ही त्यांना निरीक्षणाखाली ठेवले असून अधिक तपास करत आहोत, असे ते म्हणाले.