वेगवान महामार्गांची उभारणी, गरिबांसाठी तीन कोटी घरांचे बांधकाम, आत्मनिर्भर भारतासाठी उपयुक्त ठरणाऱ्या स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन, ३० कोटी लोकांना गॅस जोडणी... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम नेतृत्वाखाली गेल्या आठ वर्षांत भारताने नोंदवलेली ही नेत्रदीपक कामगिरी. या कामगिरीच्या जोरावर देशाची प्रतिमा उजळत असून नवभारताचे एक नवे, दमदार चित्र निर्माण झाले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टर्मची मिळून मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त सरकारच्या कामगिरीचा घेतलेला धावता आढावा...
महामार्गांची उभारणीगेल्या आठ वर्षांत महामार्ग उभारणीचा वेग वाढला आहे. ९१ हजार २७८ किमीवरून १ लाख ६४ हजार ६९४ किमीपर्यंत महामार्गांचे हे जाळे विस्तारले आहे. दररोज किमान ५० किमी रस्त्यांची उभारणी केली जात आहे.
कोरोनाकाळातही सरसकोरोनासारख्या कठीण काळातही भारतात विदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम राहिला. जगात मंदीचे मळभ या काळात असताना ६ लाख ४७ कोटींपर्यंत विदेशी गुंतवणूक देशात आली.
गरिबांसाठी घरे- यूपीए सरकारच्या कार्यकाळात १० वर्षांत गरिबांसाठी २.१० कोटी घरे उभारली गेली.
शौचालयांची उभारणी- २०१४ पर्यंत केवळ ६.२५ कोटी सरकारी शौचालये बांधली गेली होती.
गॅस जोडण्या...- गेल्या आठ वर्षांत एकूण गॅस जोडण्यांत १४ कोटींवरून ३० कोटींपर्यंत वाढ झाली. या जोडण्यांपैकी ९.१७ कोटी जोडण्या उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात आल्या आहेत.
आत्मनिर्भर भारत- २०१४ मध्ये भारतात ५०० हून कमी स्टार्ट-अप्स होते. सद्य:स्थितीत देशात ६१ हजार ४०० स्टार्ट-अप्स आहेत. त्यामुळे भारत आत्मनिर्भर होण्यास मदत होत आहे.
याशिवाय गेल्या ८ वर्षांत...
- जनधन योजनेंतर्गत ४४.६४ कोटी बँक खाती उघडण्यात आली.
- विद्यापीठांची संख्या ७२३ वरून १०४३ झाली.
- आयआयटींची संख्या १६ वरून २३ पर्यंत वाढली.
- देशाचा जीडीपी ११३.४५ लाख कोटींवरून २३६.४४ लाख कोटींवर गेला.
- निर्यात ३६ लाख कोटींवरून ५२ लाख कोटींवर पोहोचली.
- डिजिटल व्यवहारांत क्रांती होऊन १२७.७ कोटींवरून ७४२२ कोटींपर्यंत पोहोचले.