शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

कोर्टाने रोखले सरकारचे बुलडोझर; कारवाईला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 7:46 AM

उच्च न्यायालयाने स्वत:हून घेतली दखल; धार्मिक स्थळांना आग लावण्याचा पुन्हा प्रयत्न

नूह (हरयाणा) : हरयाणातील नूह येथे झालेल्या हिंसाचारानंतर पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या बुलडोझर कारवाईला स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाचा आदेश येताच उपायुक्त धीरेंद्र खरगटा यांनी तत्काळ अधिकाऱ्यांना कारवाई करण्यापासून रोखले. सरकारच्या बुलडोझर मोहिमेची उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली होती. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गुरमीत सिंग संधावालिया यांनी स्थगिती आदेश दिला.

नूह येथे गेल्या चार दिवसांपासून तोडफोड सुरू होती. यादरम्यान ७५३ हून अधिक घरे, दुकाने, शोरूम, झोपडपट्ट्या, हॉटेल पाडण्यात आली आहेत. ती बेकायदेशीर असल्याचे सांगून प्रशासनाने दावा केला की, त्यात राहणारे लोक ३१ जुलैच्या हिंसाचारात सामील होते.

पुन्हा धार्मिक स्थळाला आगगुरुग्राममध्ये रविवारी रात्री अज्ञात लोकांनी एका धार्मिक स्थळाला आग लावली. सोमवारी सकाळी याची माहिती मिळाली. लोकांच्या मदतीने आग विझविण्यात आली. सेक्टर ३७ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लोकांनी आग आटोक्यात आणेपर्यंत काही पूजा साहित्य आगीत जळून खाक झाले होते. या ठिकाणी मुस्लिम आणि हिंदू या दोन्ही समाजाचे लोक समाधीवर येतात. 

अनेक ठिकाणी कारवाईनूहमध्ये आतापर्यंत ३७ ठिकाणी प्रशासनाने कारवाई करून ५७.५ एकर जागा मोकळी केली आहे. १६२ कायमस्वरूपी आणि ५९१ तात्पुरती बांधकामे पाडण्यात आली.