शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

७१ वर्षांपूर्वी केला होता गुन्हा; अद्याप निकाल काही लागेना, रखडलेल्या ‘टॉप फाइव्ह’मध्ये महाराष्ट्रातील दोन खटल्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 9:32 AM

रखडलेल्या ‘टॉप फाइव्ह’मध्ये महाराष्ट्रातील दोन खटल्यांचा समावेश

नवी दिल्ली : न्यायदानाला विलंब म्हणजे अन्याय, असे म्हटले जाते. असे असले तरी देशातील विविध न्यायालयांत प्रलंबित कोट्यवधी खटल्यांची संख्या पाहता ही समस्या केव्हा सुटणार हाच प्रश्न निर्माण होतो. देशातील सर्वात जुना खटला ७१ वर्षांपासून सुरू आहे, हे सांगितले तर धक्का बसेल. यातील सर्वात जुन्या पाच खटल्यांपैकी दोन महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील आहेत.

एका अहवालानुसार, देशातील सर्वात जुना प्रलंबित गुन्हेगारी खटल्यात महाराष्ट्रातील रायगड येथे १८ मे १९५३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणखी एक विशेष आकडेवारी म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सध्याच्या २७ न्यायाधीशांपैकी तेव्हा कोणीही जन्माला आलेले नव्हते. सध्या न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी हे सर्वोच्च न्यायालयात सर्वात ज्येष्ठ आहेत. त्यांचा जन्म १५ मे १९५८ रोजी झाला.  

सर्वात जुने काही खटले असे...

६९ वर्षांपूर्वीचा अमलीपदार्थ बाळगल्याचा गुन्हा महाराष्ट्रातील रायगड येथे पोलिसांनी १८ मे १९५३ रोजी अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्याच वर्षी, रायगडच्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी या प्रकरणातील आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९च्या कलम ६५-ई अंतर्गत अजामीनपात्र वॉरंट जारी केले.  आता हे प्रकरण ९ फेब्रुवारी २३ रोजी सुनावणीसाठी सूचिबद्ध केले आहे.

६६ वर्षांपूर्वीचा चोरीचा खटला

आणखी एक जुना खटलाही महाराष्ट्रातील रायगड येथील आहे. २५ मे १९५६ रोजी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. चोरी केल्याप्रकरणी कलम ३८१ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण अद्याप प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुरू आहे.

सर्वात जुना दिवाणी खटला कुठे?

कोलकाता उच्च न्यायालयातील रेकॉर्डवरील सर्वात जुना दिवाणी खटला १९५१चा आहे आणि १९६९नंतरच्या सर्वात जुन्या फौजदारी खटल्यात निकालाची प्रतीक्षा आहे.

मालमत्ता वादाची ७० वर्षे

प. बंगालमधील मालदा जिल्ह्यात ३ एप्रिल १९५२ रोजी दाखल केलेल्या मालमत्ता वादाच्या फौजदारी खटल्याचा निर्णय अद्याप येणे बाकी आहे. कौटुंबिक मालमत्तेच्या विभाजनाचे हे प्रकरण होते.

टॅग्स :Courtन्यायालय