उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये आईनेच मुलीचा विश्वासघात केला आहे. मुलीचे लग्न ठरलेल्या मुलाबरोबर मुलीची आईच पळून गेली आहे. गेली ती गेली आणि वर घरातील सर्व दागिने आणि लग्नासाठी जमविलेले पैसेही घेऊन पळाली आहे.
येत्या १६ एप्रिलला मुलीचे लग्न होते. त्यापूर्वीच मुलगी आजारी पडल्याने तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. मुलीची आई आणि होणारा जावई यांच्यातच काही काळापूर्वी सूत जुळले होते. याची भनक पण मुलीला आणि महिलेच्या पतीला नव्हती. नवरी मुलगी हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याची संधी साधून तिच्या आईने जावयासोबत पलायन केले आहे.
या घडलेल्या प्रकाराने नवरी मुलगी शॉक झाली आहे. आपल्याच आईने आपल्यासोबत असा विश्वासघात केला, हे ती स्वीकारू शकत नाहीय. परंतू हे खरोखरच घडल्याने आता ती आईने नेलेले दागिने आणि पैसे परत करावेत, ती मेली काय की जगली काय आपल्याला काही फरक पड़त नसल्याचे मुलगी म्हणत आहे. पत्नीला पकडण्यासाठी पती जितेंद्र आता पोलिस ठाण्याच्या चकरा मारत आहे.
आपली आई घरातून सगळे साफ करून घेऊन गेली आहे. घरात १० रुपयेही तिने सोडलेले नाहीत. जवळपास ५ लाखांचे दागिने आणि ३.५० लाख रुपयांची रोख घेऊन ती पळाली आहे, असे मुलीचे म्हणणे आहे.
पलायने केलेल्या सासूने नुकताच जावयाला स्मार्टफोन घेऊन दिला होता. नवरी मुलगी नाही तर ती आणि होणारा जावईच फोनवर जास्त बोलायचे. यामुळे त्यांचे सूत जुळले. जेव्हा बाहेरगावी कामासाठी असलेला सासरा घरी आला तेव्हा त्या पत्नीचे आणि जावयाचे सूत जुळल्याचे लक्षात आले. ती १५-१५ तास त्याच्याशी फोनवर बोलायची. आधी त्याला काही संशय आला नाही परंतू आता पळून गेल्यावर त्यांचे लफडे होते, असा विश्वास बसला आहे.