भारताची प्रख्यात टेनिसपटू सानिया मिर्झाच्या बहिणीनने हैदराबादमधील किंग्स पॅलेस येथे दावत ए रमजानचं आयोजन केले होते. या या प्रदर्शनाला लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र अचानक तिथे दोन जणांमध्ये भांडण झालं. तसेच बघताबघता हे भांडण हातघाईवर पोहोचलं. त्याचदरम्यान गोळीबारही झाल्याने घटनास्थळावर एकच गोंधळ उडाला. तसेच आरडा ओरडा सुरू लोकांची पळापळ झाली.
ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री हैदराबादमधील किंग्स पॅलेस येथे घडल्याची माहिती समोर आली आहे. येथे रमजान निमित्त खरेदीसाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. याच गर्दीमधून अचानक दोन वेळा गोळीबार झाला. त्यामुळे उपस्थितांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि लोक घाबरून पळू लागले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपीला अटक केली. तसेच गोळीबारासाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल जप्त केलं. गुडिमल्कापूर पोलीस ठाण्यामधील पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा वाद एक अत्तर दुकानदार आणि एका खेळण्यांच्या दुकानाच्या मालकांमध्ये झाला होता. हे भांडण मिटलं होतं. मात्र त्याचदरम्यान, हसीबुद्दीन उर्फ हैदर नावाच्या व्यक्तीने विनाकारण हवेत गोळीबार केला. त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. मात्र आरोपी हसीबुद्दीन याचा या दोन्ही दुकानदारांसोबत कुठलाही संबंध नसल्याचं समोर आलं आहे. या गोळीबारानंतर आर्म्स अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, हा गोळीबार का करण्यात आला याचा शोध आता पोलीस घेत आहेत.