शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा? धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंचा संतप्त सवाल 
2
'आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है'; पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं'वर काय म्हणाले ओवेसी?
3
"पराभूत झाल्या तर मुलांचा सांभाळ करतील, याचा फायदा...", भाजप नेत्याचे RLP खासदाराच्या पत्नीबाबत विधान
4
"खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची स्टाईल", लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य, १० नोव्हेंबर २०२४ : नोकरीत फायदा होईल, सांसारिक जीवनात सुख-शांती मिळेल
6
सारंगीवादक पंडित राम नारायण यांचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
7
फुलंब्रीत प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला आग; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
8
कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!
9
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; महिलेसोबत विवस्त्र व्हिडीओ करत १० कोटींची मागितली खंडणी
10
शिवाजी पार्कवर सभेला भाजप, अजित पवार, शिंदेसेनेला परवानगी; पण उद्धव-राज यांना नाही, कारण...
11
मोठी बातमी: वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त
12
मृणाल दुसानिसचं छोट्या पडद्यावर कमबॅक, लवकरच 'या' मालिकेत दिसणार; प्रोमो रिलीज
13
ट्रक-खासगी बसची मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धडक; आठ जण गंभीर
14
विशेष लेख: ज्या भाषेत बाहेर बोलता तीच भाषा घरी वापरता का..?
15
संकटकाळी ज्यांना मदत, त्यांनीच फाेडला पक्ष; शरद पवारांचा परळीतून धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
16
मुंबईत प्रचाराच्या तोफा अद्याप थंडावलेल्याच; शेवटच्या आठवड्यात मात्र प्रचाराचा पारा चढणार!
17
दोन वर्षांच्या बालिकेची अत्याचार करून हत्या; विकृत सावत्र बापाचे निर्घृण कृत्य
18
हमास-इस्रायल युद्धात गाझाच्या ७० टक्के महिला, मुलांचा बळी गेला; युएनच्या अहवालामुळे खळबळ
19
सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा; शरद पवारांचा हल्लाबोल
20
आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली

"मोदी ज्या दिवशी PM राहणार नाहीत, त्यादिवशी भारत भ्रष्टाचार मुक्त होईल; कारण...", केजरीवालांचा हल्लाबोल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 4:14 PM

देशात ईडी आणि सीबीआयनं एक काम चांगलं गेलं आहे. त्यांनी देशातील सर्व भ्रष्टाचाऱ्यांना आज एकाच पक्षात एकत्र करुन सोडलं आहे.

नवी दिल्ली-

देशात ईडी आणि सीबीआयनं एक काम चांगलं केलं आहे. त्यांनी देशातील सर्व भ्रष्टाचाऱ्यांना आज एकाच पक्षात एकत्र करुन सोडलं आहे. आज सारे भ्रष्टाचारी लोक भाजपामध्ये आहेत. त्यामुळे ज्या दिवशी नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत. त्यादिवशी खऱ्या अर्थान देश भ्रष्टाचारमुक्त होईल, कारण सगळे भ्रष्टाचारी एकाच ठिकाणी असल्यानं त्यांना तुरुंगात धाडण्याचं काम सोपं होईल, असा टोला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी लगावला. ते दिल्लीच्या विधानसभेत बोलत होते. 

"ईडी, सीबीआयवाले येतात धाडी टाकतात. माथ्यावर बंदुक ठेवतात आणि तुरुंगात जायचंय की भाजपामध्ये जायचंय विचारतात. मनिष सिसोदियांच्या माथ्यावरही बंदुक ठेवली आणि असंच विचारलं गेलं. मनिष यांनी तुरुंगात जाणं पत्करलं पण भाजपात जाणार नाही सांगितलं. सत्येंद्र जैन यांच्याबाबतीतही असंच केलं. पण हेमंत बिसवा शर्मा, नारायण राणे, मुकुल रॉय, शुवेंद्रू अधिकारी यांनी चोरी केली होती. घोटाळे केले होते त्यामुळे त्यांनी माथ्यावर बंदुक ठेवताच भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला", असं केजरीवाल म्हणाले. 

"देशातील जितके लुटेरे, डाकू, लफंगे, भ्रष्टाचारी आणि चोर आहेत ते सर्व आज भाजपामध्ये आहेत. वेळ काही सारखी राहत नाही. वेळ बदलते. आज मोदी पंतप्रधान आहेत. पण ते काही कायमस्वरुपी राहणार नाहीत. कधी ना कधी त्यांनाही जावच लागेल. त्यादिवशी खऱ्या अर्थानं भारत भ्रष्टाचारमुक्त होईल. कारण जितके चोर-भ्रष्टाचारी आहेत ते सगळे एकाच खोलीत आहेत. त्यांना पकडणं खूप सोपं होऊन जाईल. जास्त चौकशीची गरज पडणार नाही. त्यामुळे ज्या दिवशी मोदी पंतप्रधान राहणार नाही आणि भाजपाचं सरकार राहणार नाही. तेव्हा भाजपावाल्यांना तुरुंगात टाका हा देश भ्रष्टाचारमुक्त होऊन जाईल", असंही केजरीवाल पुढे म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदी