संबल - देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच माजी काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राहुल गांधींवर हल्ला चढवत मोठा दावा केला आहे. आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राम मंदिराचा निर्णय बदलण्यासंदर्भात भाष्य केले आहे. काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली तर, राम मंदिराचा निर्णय बदलण्याच्या तयारीत आहे.
शाह बानो प्रकरणाप्रमाणे निर्णय बदलणार... आचार्य प्रमोद कृष्णम मोठा दावा करत म्हणाले, "मी 32 वर्षांहून अधिक काळ काँग्रेस पक्षात होतो. जेव्हा राम मंदिराचा निर्णय आला, तेव्हा राहुल गांधींनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत, ते म्हणाले, काँग्रेसचे सरकार आल्यानंतर आपण एक महाशक्ती आयोगाची स्थपना करणार आणि राम मंदिराचा निर्णय अगदी तसाच बदलणार, ज्या पद्धतीने राजीव गांधी यांनी शाह बानोचा निर्णय बदलला होता."
कसा बदलला होता शाह बानो प्रकरणाचा निर्मय? -62 वर्षीय मुस्लीम महिला शाह बानो हीने पतीकडून तीन तलाक मिळाल्यानंतर एप्रिल 1978 मध्ये उदरनिर्वाह भत्ता मिळावा यासाठी एक याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणीनंतर, उच्च न्यायालयाने शाह बानोच्या बाजूने निर्णय दिला होता. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला होता. यानंतर तत्कालीन राजीव गांधी सरकारने मे 1986 मध्ये मुस्लीम महिला (घटस्फोटासंदर्भात अधिकारांचे संरक्षण) कायदा संमत केला. हा कायदा संमत झाल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यात आला.