लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : शॉपिंग मॉल आणि व्यावसायिक (हाय-स्ट्रीट) क्षेत्रातील किरकोळ जागांची मागणी वर्ष २०२४ मध्ये १५ टक्के घटण्याची शक्यता आहे. वर्ष २०२३ मध्ये ही मागणी विक्रमी ७१ लाख चौरस फूट इतकी राहिली होती. रिअल इस्टेट सल्लागार संस्था ‘सीबीआरई’ने जारी केलेल्या ‘२०२४ इंडिया मार्केट आउटलुक’ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
‘सीबीआरई’चे चेअरमन तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुमन मॅगझिन म्हणाले की, वर्ष २०२३ मध्ये मजबूत ग्राहक मागणीमुळे किरकोळ क्षेत्रात उल्लेखनीय वृद्धी पाहायला मिळाली होती. वर्ष २०२४ मध्ये किरकोळ विक्रेते आणि ग्राहक दोघेही सावधानता बाळगताना दिसून येत आहेत.
मोठ्या जागांना डिमांडnकिरकोळ जागांचा पट्टा यंदा ६० ते ६५ लाख चौरस फूट राहण्याची शक्यता आहे. अनेक मॉलचे काम पूर्ण झाल्यानंतर किरकोळ जागांचा पुरवठा स्थिर राहण्याची शक्यता आहे. nदेशातील ८ प्रमुख शहरांत शॉपिंग मॉल आणि व्यावसायिक (हाय-स्ट्रीट) क्षेत्रातील किरकोळ जागांचा पट्टा वर्ष २०२३ मध्ये ४८ टक्के वाढून ७१ लाख चौरस फूट राहिला होता. त्याआधी वर्ष २०२२ मध्ये तो ४८ लाख चौरस फूट होता.