चंद्रकांत कित्तुरे -
हुबळी : उमेदवारी नाकारून भाजपने माझा आत्मसन्मान डिवचला, असे म्हणत काँग्रेसमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघात भाजपचे महेश टेंगिनकाई यांच्याकडून पराभव झाला. काँग्रेससाठी हा एक धक्का असला, तरी शेट्टर यांच्यासाठी हा राजकीय आत्मघात ठरला आहे.
हुबळीत गेल्या सहा वेळा आमदार राहिलेले शेट्टर यांना भाजपने यावेळी उमेदवारी नाकारली. मात्र, आपल्याला विधानसभेत निरोपाचे भाषण करून सन्मानाने निवृत्त व्हायचे आहे, असे सांगून ते उमेदवारीसाठी आग्रही हाेते. आत्मसन्मानाच्या नावावर तसेच विकासकामांच्या जोरावर त्यांनी जोरदार प्रचार केला. मी जाईन तिकडे या पक्षाचे कार्यकर्ते येतील, असे त्यांना वाटत होते. मात्र, त्यांची ही अपेक्षा फोल ठरली.
पराभवाची कारणे- गेली ३० वर्षे आमदार असल्याने प्रस्थापिताविरुद्धचा असंतोष n मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमविल्याचा आरोप n राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हुबळीतील मोठी ताकद n टेंगिनकाई यांचा शिस्तबद्ध प्रचार - मतदारसंघात काँग्रेसची ताकद कमीचाही परिणाम
शिष्याची गुरूवर मात भाजपचे विजयी उमेदवार महेश टेंगिनकाई हे जगदीश शेट्टर यांना गुरू मानतात. शिष्याला आपण आशीर्वाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी शेट्टर यांना केले होते. त्यामुळे गुरू-शिष्याची लढाई म्हणूनही या लढतीकडे पाहिले जात होते. त्यात शिष्याने गुरूवर मात केली आहे.
अशी पडली मते -महेश टेंगिनकाई (भाजप) - ८४,६५८जगदीश शेट्टर (काँग्रेस) - ५०,४४७