शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

आई होण्याचे स्वप्न लहान वयातच भंग पावतेय!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 6:55 AM

साधारणपणे ४५ ते ५० वयोगटातील महिलांमध्ये रजोनिवृत्ती (मासिक पाळी कायमची बंदी होणे) सुरू होते.

नवी दिल्ली :

साधारणपणे ४५ ते ५० वयोगटातील महिलांमध्ये रजोनिवृत्ती (मासिक पाळी कायमची बंदी होणे) सुरू होते. मात्र, बदलती दिनचर्या, रोजचा आहार, मद्यपान, बिघडलेली हार्मोनची स्थिती, उशिरा लग्न करणे यामुळे सध्या महिलांना ३० ते ३५ वयातच स्त्रियांमध्ये मासिक पाळी बंद होत आहे. त्याचा परिणाम म्हणून ३५ पेक्षा अधिक वय असतानाही आई होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे.नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (एनसीबीआय) च्या अहवालानुसार, २०१६ मध्ये रजोनिवृत्तीचे प्रमाण १.५% होते २०२१-२०२२ मध्ये वाढ होत २.१% झाले आहे.

जीवनशैलीतील बदल ठरतोय धोक्याचामहिला डॉक्टरांचे म्हणणे आहे की, कोरोनानंतर दर महिन्याला ३ ते ४ केसेस येत आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थानमध्ये रजोनिवृत्तीच्या समस्या येत आहेत. मुंबईमध्येही अशी प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. महिलांच्या जीवनशैलीत झपाट्याने होत असलेल्या बदलाचा परिणाम मासिक पाळीवर होत आहे.

कोणता हार्मोन धोकादायक? बहुतेक महिलांमध्ये अँटी म्युलेरियन हार्मोन (एएमएच) पातळी १ एनजी/ एमएलपेक्षा कमी असते. यामुळे गर्भधारणेतील समस्या व्यतिरिक्त वयाच्या आधी मासिक पाळी बंद होते. धूम्रपान व अल्कोहोलमुळेदेखील हार्मोनल असंतुलन होत या समस्या उद्भवतात, असे स्त्रीरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.मेट्रो शहरातील बहुतांश तरुण-तरुणी उशिरा लग्न करतात. याचा परिणाम महिलांच्या प्रजनन क्षमतेवर होतो आणि वंध्यत्वाचे प्रमाण वाढू लागते. - डॉ. शालिनी राठोड, स्त्रीरोगतज्ज्ञलक्षणे काय? कमी झोप, वजन वाढणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, लघवी संसर्ग, अचानक घाम येणे, चिडचिड, नैराश्य, राग-मूड बदलणे, अनियमित मासिक पाळी येणे, सेक्स करण्याची इच्छा कमी होणे, लघवीवरील नियंत्रण कमी होणे ही रजोनिवृत्ती येण्याची लक्षणे आहेत.काय कराल? रजोनिवृत्ती दरम्यान जास्तीत जास्त वेळ सैल कपडे घाला. वजनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. योगासने, व्यायाम, सकस आहार, भरपूर पाणी प्या, तळलेल्या आणि गरम अन्नापासून दूर राहा.