शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

कसे साकारले श्रीराम मंदिर?, अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिराचा पाहा, संपूर्ण इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 8:48 AM

प्रभू श्रीरामांचा पुत्र कुश याने उभारले पहिले राम मंदिर

अयोध्येतील भगवान श्रीरामजन्मभूमी मंदिराचा संपूर्ण इतिहास मोठा आहे. प्रभू श्रीरामांचा पुत्र कुश याने पहिले मंदिर उभारल्याचा उल्लेख पाैराणिक ग्रंथात आढळताे. त्याशिवाय महाराजा विक्रमादित्य यांनी दुसऱ्यांदा श्रीराम मंदिर बांधले हाेते. त्यानंतर शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांनी रामजन्मभूमीला भेट दिल्याचा उल्लेख गुरू ग्रंथसाहिबमध्ये आहे. न्यायालयात हा एक पुरावा मानला गेला. या संदर्भातील घडामाेडींवर एक नजर...

प्रभू श्रीरामांचा पुत्र कुश याने उभारले पहिले राम मंदिरपौराणिक कथा आणि धार्मिक ग्रंथांवर आधारित पारंपरिक माहितीनुसार, प्रभू श्रीराम जेव्हा प्रजेसह वैकुंठाला गेले तेव्हा संपूर्ण अयोध्यानगरी शरयूमध्ये लीन झाली. केवळ अयोध्येची भूमी वाचली आणि ही भूमी वर्षानुवर्षे तशीच पडून राहिली. पुढे कौशांबीचे महाराज कुश यांनी अयोध्येची पुनर्स्थापना केली. त्याचे वर्णन कालिदासांच्या ‘रघुवंश’ या ग्रंथात आढळते. लोमश रामायणानुसार, त्यांनी आपल्या वडिलांच्या पूजनीय जन्मस्थानावर दगडी खांब असलेले मंदिर बांधले.

महाराजा विक्रमादित्य यांनी बांधले होते भव्य श्रीराम मंदिरभविष्य पुराणानुसार उज्जैनचे महाराजा विक्रमादित्य यांनी उजाड झालेल्या अयोध्येची पुन्हा एकदा (दुसऱ्यांदा) उभारणी केली होती. धार्मिक ग्रंथानुसार त्यांनी अयोध्येत शरयू नदीच्या लक्ष्मण घाटाच्या परिसरात ३६० मंदिरे बांधली होती. हिंदू पक्षाचा असा दावा राहिलेला आहे की, बाबरच्या आधीही आक्रमक सालार मसूदने १०३३ मध्ये श्रीरामजन्मभूमी मंदिर उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर या पवित्र मंदिराची पुनर्बांधणी (तिसऱ्यांदा) गहडवाल वंशाच्या राजांनी केली.

१५१०- १५११ मध्ये गुरुनानक देवजींनी जन्मभूमीला भेट दिलीअयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या वादाची सुरुवात १५२८ मध्ये झाली. हिंदूंचा असा दावा आहे की, मुघल आक्रमक बाबरने ते पवित्र स्थान पाडून त्यावर मशीद बांधली. अयोध्या श्रीरामजन्मभूमी वादावर ऐतिहासिक निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने शीख ग्रंथ महत्त्वाचा पुरावा मानला आहे. ज्यानुसार शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देवजी यांनी आक्रमक बाबर भारतात येण्यापूर्वीच श्रीरामजन्मभूमीचे दर्शन घेतले होते. गुरू नानक देवजी १५१० ते १५११ च्या दरम्यान अयोध्येत आले होते. तर, बाबरी मशीद १५२८ मध्ये बांधली गेली होती. इतिहासकारांच्या मते बाबरच्या सांगण्यावरून त्याच्या एका सुभेदाराने तिथे मशीद बांधली होती. 

श्रीराम मंदिराचा इतिहास

२३ डिसेंबर १९४९ रोजी रामलल्लांची मूर्ती आत सापडली. श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या  इतिहासात २३ डिसेंबर १९४९ रोजी एक वळण आले. त्या दिवशी अचानक रामलल्लांची मूर्ती आतील बाजूला विराजमान असलेली दिसली. हा वाद इतका वाढला की, शेवटी तत्कालीन सरकारने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून  ही वास्तू वादग्रस्त मानली आणि त्याला टाळे ठोकले. आतील नमाज थांबली. पण, बाहेर श्रीराम चबुतरा आणि परिसरात उर्वरित भागात पूजा निरंतर सुरूच राहिली.

१८५९ मध्ये पुन्हा पूजा करण्याची परवानगीजन्मभूमीच्या आसपासच्या भागात प्रथम १८५३ मध्ये दंगलीचा उल्लेख सापडतो. १८५९ मध्ये इंग्रजांनी मुस्लिमांना आतील बाजूला, तर हिंदूंना श्रीराम चबुतऱ्यावर पूजेची परवानगी दिली. १८८५ मध्ये महंत रघबीर दास यांनी पहिल्यांदा मंदिर बांधण्याबाबत फैजाबाद न्यायालयात याचिका दाखल केली. ती न्यायालयाने फेटाळली. 

१९८९ मध्ये वादग्रस्त जागेजवळ पायाभरणीऑगस्ट १९८९ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने फैजाबाद जिल्हा न्यायालयाकडून खटला वर्ग करून घेतला आणि वादग्रस्त जमिनीवर यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले. नोव्हेंबर १९८९ मध्ये तत्कालीन सरकारने पायाभरणी करण्यास परवानगी दिली. 

अलाहाबाद हायकोर्टाने दिला निर्णय   एप्रिल २००२ पासून अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त जमिनीच्या मालकी हक्कांवर सुनावणी सुरू केली. ३० सप्टेंबर २०१० रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने ही मालमत्ता तीन दावेदारांमध्ये विभागण्याचा निर्णय दिला. जन्मभूमीसह एक तृतीयांश हिस्सा हिंदूंना, एक तृतीयांश हिस्सा निर्मोही आखाड्याला आणि तिसरा हिस्सा मुस्लीम समुदायाला दिला. 

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या