जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना घडली. मेहबुबा मुफ्ती या काश्मीर खोऱ्यातील जम्मू-काश्मीर येथून अनंतनागकडे रवाना झाल्या असता ही दुर्देवी घटना घडली. सुदैवाने, या दुर्घटेने त्यांना कुठेही दु:खापत झाली असून कारमधील सुरक्षा रक्षकही सुरक्षीत आहेत.
जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्ष असलेल्या पीडीएफच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्या स्कॉर्पिओ कारला भीषण अपघात झाला. त्यामध्ये, कारचा पुढील भाग तुटल्याचे दिसून येत आहे. सुदैवाने मेहबुबा मुफ्ती बचावल्या असून त्या सुरक्षीत आहेत. यासंदर्भात जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही ट्विट करुन माहिती दिली.
मेहबुबा मुफ्ती साहिबा दुखापतीतून बचावल्या, ही आनंदाची बाब आहे. मात्र, अपघाताची ही घटना गंभीर घटना असून सरकारने अपघाताच्या घटनेची चौकशी, अशी मागणी ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरुन केली आहे. तसेच, या अपघातातून मुफ्ती यांच्या सुरक्षेसंदर्भात असलेल्या कमींची पूर्तता करावी, असेही अब्दुल्ला यांनी म्हटले.