शहरं
Join us  
Trending Stories
1
जय शाहंची ऐतिहासिक घोषणा! IPL खेळणाऱ्यांना 'बोनस', कराराच्या रकमेव्यतिरिक्त लाखोंचा वर्षाव
2
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
4
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
5
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
6
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
7
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
8
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
9
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
10
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
11
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
12
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
13
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
14
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
15
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
16
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
17
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
18
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
19
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
20
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित

कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 4:51 PM

यापूर्वी दिल्ली सरकारने कोरोना महामारीत जीव गमावलेल्या 92 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत केली होती.

दिल्ली सरकार कोरोना महामारीदरम्यान आपला जीव गमावलेल्या पाच जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये देणार आहे. मुख्यमंत्री अतिशी यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यापूर्वी दिल्ली सरकारने कोरोना महामारीत जीव गमावलेल्या 92 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत केली होती.

कोरोना महामारी हे संपूर्ण मानवतेसाठी एक भयंकर संकट होते -यावेळी मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या,  (CM Atishi) दिल्लीतील लोकांनी कोरोना महामारीदरम्यान आपल्या जीवाची परवा न करता, मानवता आणि समाजाच्या रक्षणासाठी काम केले आणि बलिदान दिले. दिल्ली सरकार त्यांना सॅल्यूट करते. या रकमेने मृतांच्या कुटुंबीयांचे झालेले नुकसान नक्कीच भरून निघू शकत नाही. मात्र, यामुळे त्यांना सन्मानाचे जगण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते. कोरोना महामारी हे संपूर्ण मानवतेसाठी एक भयंकर संकट होते.

"या संकटाने सर्वांच्याच मात दहशत निर्माण केली होती. मात्र, आपले डॉक्टर, मेडिकल स्टाफ, सहायक स्टाफ आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांसह हजारो लोकांनी रात्रंदिवस काम करून या महामारीचा सामना करण्याचे काम केले. यात अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. सरकार या लोकांच्या कुटुंबीयांसह नेहमीच खांद्याला खांदा लावून उभे आहे," असेही आतिशी म्हणाल्या.

या लोकांच्या कुटुंबीयांना मिळणार मदत - 

संजय मनचंदा, फार्मासिस्ट एसडीएमसी -मनचंदा हे कोरोना काळात एसडीएमसी पेशन्ट केअर फॅसिलिटीमध्ये फार्मासिस्ट म्हणून कार्यरत होते. याशिवाय, ते आशा वर्कर्स आणि एएनएमसोबत कंटेनमेंट झोनलाही भेट देत होते. सेवेवर असतानाच त्याला कोरोनाची लागण झाली आणि काही दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला.

रवि कुमार सिंह -रवी कुमार हे मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत होते. येथे कर्तव्यावर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.

वीरेंद्र कुमार -वीरेंद्र कुमार एक सफाई कर्मचारी होते, ते कोरोना काळात भूक निवारण केंद्रातील साफसफाईचे काम बघत होते. ड्युटीवर असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली आणि काही दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला.

भवानी चंद्र -भवानी चंद्रा हे दिल्ली पोलिसात एएसआय होत्या, ते कोरोना काळात लोकनायक रुग्णालयात ड्युटीवर होते. ड्युटीवर असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्याचा मृत्यू झाला.

मो. यासीन -मोहम्मद यासीन एमसीडीमध्ये प्राथमिक शिक्षक होते. कोरोना काळात, मोहम्मद यासीन रेशन वितरण कर्तव्यावर होते. यादरम्यान, त्यांनाही कोरोना संसर्ग झाला आणि काही दिवसांत त्याचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Atishiआतिशीcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीAam Admi partyआम आदमी पार्टी