लोकमत न्यूज नेटवर्क सहारनपूर : उत्तर प्रदेशमधील सहारनपूरच्या सावंत खेडी गावचे माजी प्रमुख जगपाल सिंह यांनी आपल्या विधवा सुनेचा मोठ्या थाटामाटात पुनर्विवाह लावून दिला. स्वतःच्या मुलीप्रमाणे ‘कन्यादान’ करून घरातून पाठवणीदेखील केली.
जगपाल सिंह यांच्या मुलाचे, शुभम राणाचे लग्न २०२१ मध्ये मेरठच्या सलावा गावातील मोनाशी झाले होते. मात्र, अवघ्या तीन महिन्यांतच शुभमचे निधन झाले. मुलाच्या मृत्यूच्या दुःखासोबतच सुनेचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे त्यांना बघवत नव्हते. सुनेच्या भविष्याची त्यांना काळजी वाटू लागली. म्हणूनच त्यांनीतिचा पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला.
हरयाणातून आली वरात nयाबाबत त्यांनी आपल्या सुनेचेही मत घेतले. सुनेने होकार दिल्यावर बरेच स्थळ बघितले. अखेरीस, हरयाणातील गोलनी येथील सागर याच्याशी आपल्या सुनेचे लग्न निश्चित केले. n४ डिसेंबरला मोठ्या थाटामाटात हा विवाह पार पडला. जगपाल यांनी वडिलांचे कर्तव्य पार पडत सुनेचे कन्यादान केले, तिला नवीन कार, लाखोंचे दागिने आणि अन्य काही वस्तू गिफ्ट म्हणूनही दिल्या. nसागर हा सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबातील असून, सुनेला नेहमी मुलीप्रमाणे वागवले आणि तिच्या भविष्याचा विचार करूनच सागरशी लग्न लावून दिल्याचे त्यांनी सांगितले.