नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ मतदारसंघासह देशातील ८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ४९ मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे. यासोबतच ओडिशा विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील ३५ जागांसाठीही मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रातील पाचपैकी हा अखेरचा टप्पा असल्याने अधिकाधिक मतदान करण्याचे आवाहन आयाेगाने मतदारांना केले आहे. यावेळी राज्यातील २६४ व देशातील ६९५ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये सीलबंद होणार आहे.
पाचव्या टप्प्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील १४, महाराष्ट्रातील १३ व प. बंगालमधील ७ जागांचा समावेश आहे. हा टप्पा संपताच देशातील ४२९ म्हणजेच ७९ टक्के मतदारसंघातील मतदान आटोपणार आहे. त्यानंतर उर्वरित सहाव्या व सातव्या टप्प्यात प्रत्येकी ५७ जागांसाठी मतदान होईल.
पाचव्या टप्प्यातील दिग्गज उमेदवार -
कलंक पुसण्यासाठी मतदान करण्याचे आवाहनमुंबई, ठाणेसारख्या महानगरांमध्ये आतापर्यंत कमी मतदान होत असल्याचा, येथील मतदार मतदान करण्याबाबत उदासीन असतात, असे म्हटले जाते. त्यामुळे येथील मतदारांनी हा कलंक पुसून काढण्यासाठी सोमवारी मतदानासाठी जास्तीत जास्त संख्येने घराबाहेर पडण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.