उत्तराखंडच्या बोगद्यामध्ये गेल्या १७ दिवसापासून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे प्रयत्न सुरू होते. अडकलेल्या ४१ कामगारांपर्यंत पाईप टाकण्यात आला होता. एनडीआरएफ देखील त्यांच्या पर्यंत पोहोचली आहे, आता एनडीआरएफच्या प्रयत्नांना यश आले आहे. एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अडकलेल्या सर्व ४१ मजुरांना बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले आहे.
उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे. बचाव पथकांनी बोगद्याच्या वरून खोदकाम आणि उभ्या ड्रिलिंग केले. पाईपद्वारे कामगारांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बाहेर पडलेल्या कामगारांची आरोग्य तपासणी सुरू आहे. उर्वरित कामगारांनाही एक एक करून बाहेर काढले जात आहे. एनडीआरएफच्या तीन तुकड्या बोगद्याच्या आत आहेत.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी बाहेर काढलेल्या मजुरांची भेट घेत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंग हेही तिथे उपस्थित आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बचाव कार्यात असलेल्या कामगार आणि जवानांच्या मनोबलाचे आणि धैर्याचे कौतुक केले. बाहेर काढण्यात आलेल्या कामगारांचे नातेवाईकही उपस्थित आहेत. बोगद्यातून बाहेर काढण्यात आलेल्या कामगारांचे प्राथमिक आरोग्य चेकअप बोगद्यात बांधण्यात आलेल्या तात्पुरत्या वैद्यकीय शिबिरात केले जात आहे.
आधी २ रुग्णांना बाहेर काढलं; बांधकामाच्या ठिकाणी आरोग्य तपासणी
गेल्या १७ दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात यश आले आहे. सुरुवातीला दोन कामगांरांना बाहेर काढण्यात आले आणि नंतर इतरांनाही बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या कामरांना तपासणीसाठी बांधकामाच्या ठिकाणी तात्पुरते रुग्णालय तयार ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी त्या कामगारांची तपासणी करण्यात येणार आहे. या ठिकाणापासून मेन रुग्णालय ३० किलोमीटर दूर आहे. येथे घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहीका तयार ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या बोगद्यातून ४१ कामगारांना बाहेर काढले आहे.