अयाेध्येतील श्रीराम मंदिराची रचना एका विशिष्ट पद्धतीने करण्यात आली आहे. त्यात एक अशी यंत्रणा बसविण्यात आली आहे, ज्यामुळे श्रीरामलल्लांच्या मूर्तीच्या कपाळावर श्रीरामनवमीच्या दिवशी सूर्यकिरणांचा स्पर्श हाेईल. या अद्भुत घटनेचे सुमारे ६ मिनिटे दर्शन घेता येईल. जाणून घेऊ या ही यंत्रणा कशी कार्य करते...
-मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर शिखराजवळ ‘ऑप्टाेमेकॅनिकल’ यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेला ‘सूर्य तिलक’ असे नाव दिले आहे. सूर्यप्रकाश श्रीरामलल्लांच्या ललाटी आणण्यासाठी प्रकाशाचा मार्ग परावर्तित करण्यात येईल.
-सूर्यकिरणे एका जागेतून प्रवेश करतील. ती या उपकरणाच्या लेंसवर पडतील. तेथून ती परावर्तित करण्यात येतील. त्यासाठी विशिष्ट प्रकारचा आरसा एका ठराविक काेनात बसविण्यात आला आहे.
-परावर्तित किरणे एका छाेट्या अंतर्गत बाेगद्यातून पहिल्या माळ्यावर गाभाऱ्यापर्यंत पाेहाेचतील.
-गाभाऱ्याच्या बाहेर एक आरसा ठरावीक काेनात बसविलेला आहे. तेथून सूर्यकिरणे परावर्तित हाेऊन श्रीरामलल्लांच्या कपाळाला स्पर्श करतील. हे विलाेभनीय दृश्य श्रीरामनवमीला दुपारी १२ वाजता पाहता येईल