S jaishankar Birthday : भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर आज ९ जानेवारी २०२५ रोजी आपला ७० वा वाढदिवस साजरा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे. आपल्या हजरजबाबी क्षमतेमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या एस जयशंकर यांची प्रेमक कहाणीही तेवढीच खास आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे दोन लग्न झाले आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव शोभा असे होते. त्या भारतीय होत्या. तर त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव क्योको सोमेकावा, असे आहे. त्या मुळच्या जपानच्या आहेत.
शोभा यांच्यासोबत झाले होते पहिले लग्न -डॉ. एस. जयशंकर जेएनयूमध्ये शिकत असताना त्यांची ओळख शोभा यांच्याशी झाली. आधी दोघे मित्र होते. मात्र नंतर, मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. यानंतर दोघांनीही लग्न केले. लग्नानंतर काही वर्षांनी शोभा यांना कर्करोग झाला. त्यांनी या आजाराशी काही काळ झुंजत दिली. मात्र, त्यांचे निधन झाले. शोभा यांच्या निधनानंतर, एस. जयशंकर हे जपानमधील टोकियो येथील भारतीय दूतावासात कार्यरत होते. येथेच त्याची ओळख क्योको सोमेकावा यांच्याशी झाली. क्योको त्याच्या दुसऱ्या पत्नी बनल्या. क्योको अनेकदा एस जयशंकर यांच्यासोबत राजकीय पार्ट्या आणि कार्यक्रमांतही दिसतात.
क्योको सोमेकावा यांची भेट -एस जयशंकर १९९६ ते २००० पर्यंत जपानची राजधानी टोकियो येथील भारतीय दूतावासात कार्यरत होते. जपानमधील या चार वर्षांच्या कार्यकाळात, एस. जयशंकर यांची त्यांची सध्याची पत्नी क्योको सोमेकावा यांच्यासोबत टोकियोतील भारतीय दूतावासात भेट झाली आणि त्यांची मैत्रीही झाली. एस. जयशंकर आणि त्यांची पत्नी क्योको यांच्याबद्दल आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यांचा वाढदिवसही ९ जानेवारीलाच असतो.
एस. जयशंकर यांना ध्रुव आणि अर्जुन ही मुले तर मेघा नावाची मुलगी, असे तीन मुले आहेत. मेघा फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे आणि तिने बीबीसीचा शो टॉकिंग मूव्हीजसाठी रिपोर्टर आणि कॅमरा ऑपरेटर म्हणूनही काम केले आहे. महत्वाचे म्हणजे, क्योको सोमेकावा या हिंदी भाषेतही अत्यंत चांगल्या प्रकारे बोलू शकतात.