जयपूर : मीरा संपूर्ण आयुष्यात भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन राहिली. जयपूर जिल्ह्यातील गोविंदगड पंचायत समितीच्या नृहसिंहपुरा गावात राहणाऱ्या तीस वर्षीय पूजा सिंहने देवाच्या भक्तीत तल्लीन होऊन भगवान सालिगरामजींसोबत लग्न केले.
८ डिसेंबरला हिंदू रीतीरिवाजांनुसार हा विवाह झाला. मुलीच्या लग्नात वडील सहभागी झाले नाहीत, आईने सर्व विधी पार पाडले. साळीगरामजी आणि गावातील मंदिरातून वराच्या रूपात पूजेच्या घरी पोहोचलेल्या लोकांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्व विधी उरकण्यात आले. आई रतन कंवर या लग्नात आनंदी दिसत होत्या. (वृत्तसंस्था)
आईने लग्नाचे विधी पार पाडलेपूजाने राज्यशास्त्रात एमए केले आहे. वडील प्रेमसिंग बीएसएफमधून निवृत्त झाले आहेत आणि मध्य प्रदेशात सुरक्षा एजन्सी चालवतात. आई रतन कंवर या गृहिणी आहेत. तीन लहान भाऊ आहेत. सालिगरामजींशी लग्न करण्याचा निर्णय पूजाचाच होता. सुरुवातीला समाज, नातेवाईक आणि कुटुंबीयांना हे मान्य नव्हते, पण नंतर आईने मुलीच्या इच्छेला मान देऊन होकार दिला.
लोकांचा विचार केला नाहीलोकांनी पूजाचा हा निर्णय आणि लग्न स्वीकारले नाही, अनेकांनी विरोधही केला; पण, पूजाला त्याची पर्वा नव्हती. त्याचवेळी लग्न लावून दिलेले पंडित आचार्य राकेश कुमार यांनी सांगितले की, हिंदू रीतीरिवाजानुसार देवाशी लग्न करता येते.
का घेतला निर्णय?पूजाने सांगितले की, तिने समाजात जे पाहिले होते ते पाहून तिला लग्न करायचे नव्हते. जेव्हा लोक तिला टोमणे मारायला लागले, तेव्हा तिने देवाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासून पती-पत्नींमध्ये क्षुल्लक गोष्टींवरून भांडण होत असल्याचे तिने पाहिले आहे. यामध्ये वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. पंडितजींना विचारले असता ते म्हणाले की, असे होऊ शकते. घरातील खोलीत एक छोटेसे मंदिर बनवले आहे, ज्यामध्ये सालिगरामजी आहेत. ती आता त्यांच्यासमोर जमिनीवर झोपते.