शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

मुलीला विंडो सीटवर बसायचंय, प्लीज सीट बदलता...? एका अदला-बदलीने ओडिशा रेल्वे अपघातात वाचला बाप-लेकिचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2023 10:34 AM

कारण त्यांचे तिकीट ज्या कोचमध्ये होते, तो कोच अत्यंत वाईट पद्धतीने अपघातग्रस्‍त झाला आहे. यातील अधिकांश लोकांचा मृत्यू झाला आहे. 

भुवनेश्वर - "काळ आला होता, पण वेळ आली नव्हती", ही म्हण एक बाप-लेकीला अगदी फीट बसते. हे लोक शुक्रवारी कोरोमंडल ट्रेनने प्रवास करत होते. खरे तर, ही नशिबाचीच कमाल म्हणावी लागेल की, एम के देब आणि त्यांची आठ वर्षांची मुलगी स्वाती यांनी प्रवासादरम्यान आपल्या सीटची अदलाबदल केली. यामुळे त्यांनी अखेरच्या क्षणी मृत्यूला मात दिली. कारण त्यांचे तिकीट ज्या कोचमध्ये होते, तो कोच अत्यंत वाईट पद्धतीने अपघातग्रस्‍त झाला आहे. यातील अधिकांश लोकांचा मृत्यू झाला आहे. 

खरे तर एम के देब आणि त्यांची मुलगी खडगपूर येथून ट्रेनमध्ये बसले होते आणि त्यांना कटकमध्ये उतरायचे होते. कारण शनिवारी त्याची एका डॉक्टरसोबत अपॉइंटमेंट होती. त्यांच्याकडे थर्ड एसी कोचचे तिकीट होती. मात्र मुलीने खिडकीत बसण्याचा आग्रह केला होता. देब म्हणाले, आमच्याकडे विंडो सीट तिकीट नव्हते. त्यामुळे आम्ही टीसीला विनंती केली. यावर, जर शक्य असेल तर ते इतर प्रवाशांसोबत आपले तिकीट अदलाबदल करू शकतात, असा सल्ला त्यांनी दिला. यानंतर आम्ही दुसऱ्या कोचमध्ये गेलो आणि दोन जणांना विनंती केली. ते राजी झाले. यानंतर ते आमच्या मुख्य कोचमध्ये गेले आणि आम्ही त्यांच्या कोचमध्ये आलो. जे आमच्या सीटपासून तीन कोट दूर होते. 

सुदैवाने बचावले -या दोघांनी सीट बदलल्यानंतर काही वेळाने भयंकर ट्रेन अपघात झाला. या अपघातात जवळपास 288 जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने ज्या कोचमधून या बाप-लेकीची जोडी प्रवास करत होती त्या कोचचे फारसे नुकसान झाले नाही. मात्र ज्या कोचमध्येचे त्यांचे तिकीट होते, त्या कोचचे प्रचंड नुकसान जाले. यातील अनेकांचा मृत्यू झाला.

'चमत्कारासाठी देवाचे आभार' -देब म्हणाले, आमच्यासोबत जागा बदलण्यास तयार झालेल्या दोन प्रवाशांच्या स्थितीसंदर्भात आम्हाला माहीत नाही. आम्ही त्याच्या सुरक्षित आयुष्यासाठी प्रार्थना करतो. तसेच, या चमत्कारासाठी देवाचे आभारी आहोत. आमच्या डब्यातील जवळपास सर्वच प्रवासी सुखरूप होते.

देब म्हणाले, किरकोळ जखमी झालेले लोक आणि आपली मुलगी स्थानिक लोकांच्या मदतीने शनिवारी सकाळच्या सुमारास कटक येथे पोहोचलो. मुलीच्या डाव्या हाताला फोट आला आहे. तिला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. यावेळी, बाल रोग तज्ज्ञ विक्रम सामल म्हणाले, जेव्हा मला हे दोघे अगदी चमत्कारिकपणे बचावल्याचे समजले, तेव्हा माझ्याकडे भावना व्यक्त करायला शब्दच नव्हते. अपघातानंतर, कोचमध्ये पडूनही त्यांना किरकोश मार लागला आहे.

टॅग्स :OdishaओदिशाAccidentअपघातrailwayरेल्वेDeathमृत्यू