५ किमी खांद्यावर घेऊन आणला मुलीचा मृतदेह,  रुग्णालयाकडून शववाहिका देण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 08:12 AM2022-06-11T08:12:01+5:302022-06-11T08:12:23+5:30

दमाेह येथील जिल्हा रुग्णालयात चार वर्षीय राधा हिचा मृत्यू झाला. तिचे वडील लक्ष्मण हे अतिशय गरीब आहेत. रुग्णालय प्रशासनाने त्यांना शववाहिका देण्यास नकार दिला.

The girl's body was carried on her shoulder for 5 km. The hospital refused to provide a hearse | ५ किमी खांद्यावर घेऊन आणला मुलीचा मृतदेह,  रुग्णालयाकडून शववाहिका देण्यास नकार

५ किमी खांद्यावर घेऊन आणला मुलीचा मृतदेह,  रुग्णालयाकडून शववाहिका देण्यास नकार

Next

छतरपूर : मध्य प्रदेशच्या छतरपूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने शववाहिका देण्यास नकार दिल्यामुळे, एका पित्याला त्याच्या लहान मुलीचा मृतदेह खांद्यावर आणावा लागला. लाेकांनी त्यांचे व्हिडीओ काढून व्हायरल केले. मात्र, कुणीही मदतीसाठी पुढे आले नाही.

दमाेह येथील जिल्हा रुग्णालयात चार वर्षीय राधा हिचा मृत्यू झाला. तिचे वडील लक्ष्मण हे अतिशय गरीब आहेत. रुग्णालय प्रशासनाने त्यांना शववाहिका देण्यास नकार दिला. बक्सवाहा नगर पंचायतीमध्येही त्यांना कुणीच मदत केली नाही. अखेर त्यांनी बसमध्ये एका गाेधडीत चिमुकलीचा मृतदेह गुंडाळून बक्सवाहापर्यंत आणले. तिथून पुढे त्यांचे गाव ५ किलाेमीटर अंतरावर आहे. तिथे मृतदेह नेण्यासाठीही कुणी त्यांना मदत केली नाही. अखेर लक्ष्मण, त्यांचे बंधू व वडील तिचा मृतदेह खांद्यावर तेवढे अंतर पायी चालून घरी घेऊन आले. (वृत्तसंस्था)

घराजवळ पाेहाेचल्यानंतर आली शववाहिका
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जागे झालेल्या अधिकाऱ्यांनी शववाहिका पाठविली. परंतु, ताेपर्यंत ते गावाजवळ पाेहाेचले हाेते. तेवढ्यापुरतीच मदत त्या कुटुंबाला झाली. जिल्हाधिकारी राहुल सिलाडिया यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून, चाैकशीचे आदेश दिले आहेत

Web Title: The girl's body was carried on her shoulder for 5 km. The hospital refused to provide a hearse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.