काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावासंदर्भात केलेल्या विधानावरून कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली होती. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांना सरकारी बंगला सोडाला लागला. आता राहुल गांधी हे काँग्रेसच्या दिवंगत नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निवासस्थानी राहण्यासाठी जाण्याची शक्यता आहे. हे घर बी-२ निजामुद्दीन ईस्टमधील पहिल्या मजल्यावर आहे. शीला दीक्षित ह्या इथे १९९१ ते १९९८ आणि २०१५ नंतर राहत होत्या. त्यांचे पुत्र संदीप दीक्षित यांनी हल्लीच त्यांच्या काही निकटवर्तीयांना एक अनौपचारिक संदेश पाठवून ते आपलं निवसास्थान बी-२ येथून ए-५ मध्ये शिफ्ट करणार शिफ्ट करणार आहेत, अशी माहिती दिली होती.
राहुल गांधी यांनी त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द झाल्यानंतर २२ एप्रिल रोजी त्यांचं सरकारी निवासस्थान १२, तुघलक लेन रिकामी केलं होतं. निवासस्थान रिकामी केल्यानंतर मी खरं बोलण्याची किंमत मोजलीय. भारताच्या जनतेनं मला हे घर दिलं होतं. तिथे मी १९ वर्षे राहिलो होतो.
तर राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या की, माझा भाऊ जे बोललाय ते खरं आहे. तो सरकारविरोधात बोलला होता. त्यामुळेच हे सारं काही होत आहे. तो खूप हिंमत बहादूर आहे. मीसुद्धा त्याच्यासोबत आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांना नोटिस पाठवून २२ एप्रिलपर्यंत हा बंगला खाली करण्यासा सांगितले होते.
राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी कर्नाटकमधील एका प्रचारसभेवेळी मोदी आडनावावरून एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून दाखल याचिकेवर सुनावणी करताना गुजरातमधील एका न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवले होते. तसेच त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाल्याने त्यांचं लोकसभा सभासदत्वही संपुष्टात आलं होतं. त्या याचिकेला राहुल गांधी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता.