नवी दिल्ली: देशातील करदात्यांची अवस्था भीक नको, कुत्रं आवर, अशी झाली आहे. कराचा बोझा इतका जास्त आहे की, उत्पन्न कुठे जातेय कळत नाही. सरकार गरिबांना लुटून श्रीमंतांचे घर भरत आहे, अशी जोरदार टीका खासदार विशाल पाटील यांनी बुधवारी संसदेत केली.
अर्थसंकल्पावरील चर्चेत त्यांनी कर धोरणावर हल्ला चढवला. साठ लाख रुपये कमावून करात लुटल्या गेलेल्या एका मित्राचे उदाहरण देताना विशाल पाटील म्हणाले, माझ्या मित्राला १७ लाखांची गाडी घेण्यासाठी साठ लाख कुठे गेले कळालेच नाही. कमाई आम्ही करायची, लुटायचे दुसऱ्याने आणि गोळा करायचे सरकारने ही चांगली भागीदारी आहे. बेंजामिन फ्रॅक्लिनने म्हटले आहे की, या जगात काहीही शाश्वत नाही, कर वगळता. सरकारने हे खूप गांभिर्याने घेतलेले दिसते. इतके सगळे कर लावलेत की, कमाई कुठे जातेय कळतच नाही. आजकाल ऑक्सिजनवरही कर लावला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच नॉर्थ ब्लॉकमध्ये बसून ते डिक्शनरी उघडतात आणि जो पहिला शब्द दिसेल त्यावर कर लावून रिकामे होतात की काय? एखाद्याला आपली मालमत्ता विकायची आहे, संकट आहे, त्यावेळी सरकारच्या मदतीची गरज असते. पण, सरकार या काळात अधिकच कर वसूल करते. उलट अपेक्षा होती, हा एलटीसीजी कर कमी झाला पाहिजे. अर्थमंत्र्यांना कमी केले, मात्र लाभ कमी केला. भीक नको, पण कुत्रं आवरं अशी अवस्था करदात्यांची झाली आहे. महंगाई डायन खा रही हैं. सरकार शैतान बनकर लूट रही हैं, अशी अवस्था आहे. रॉबिन हूड श्रीमंतांना लुटून गरिबांना देत होता. हे सरकार गरिबांना लुटून श्रीमंतांची घरे भरत आहे असंही खासदार विशाल पाटील म्हणाले.
सेस, सरचार्ज लावून राज्याचा वाटा चोरलाविशाल पाटील म्हणाले, सेस व सरचार्ज लावून राज्याचा वाटा चोरला आहे. हे षङयंत्र आहे. महाराष्ट्रात प्रचंड कर देतो, आमच्या वाट्याला काय आले. सामान्य माणसाचा बदला घेणारा हा अर्थसंकल्प आहे.
४५ लाखांत घर मिळत नाही४५ लाखांपर्यंतच्या घराला १ टक्के जीएसटीची मर्यादा आहे. ४५ लाखांत घर मिळत नाही, ही मर्यादा थोडी वाढवायला हवी. लिमिटेड लायबिलिटी पार्टनशीपमध्ये छोट्या घटकांना आणल्यास अजून फायदा होईल, असेही विशाल पाटील म्हणाले.