शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ नखांबाबत इतिहासकारांचा खळबळजनक दावा; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका; म्हणाले...
2
कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; चकमकीत दोन जवान जखमी
3
मासिक पाळीत नोकरदार महिलांना सुट्टी? सर्वोच्च न्यायालयाला वाटतेय मोठी भीती, आम्ही आदेश दिला तर...
4
Paris Diamond League : महाराष्ट्राचा 'लेक' काय धावला राव! अविनाशचा नवा रेकॉर्ड; शेतकरी पुत्राची गरूडझेप
5
Eknath Shinde: मी राज्याचा मुख्यमंत्री असेपर्यंत...; एकनाथ शिंदेंचा राज्यातील जनतेला मोठा शब्द
6
'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलची तुफान फटकेबाजी, आफ्रिकेच्या संघाला धू धू धुतलं.. (Video)
7
Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला, मुलांच्या रुग्णालयासह ५ मोठ्या शहरांना लक्ष्य, २० लोकांचा मृत्यू
8
“शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेचा अहंकार”; वरळी हिट अँड रन प्रकरणावरुन नाना पटोलेंची टीका
9
Home Loan : बजेटनंतर स्वस्त होणार होमलोन? वाचा सविस्तर
10
वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर; कर्णधार टेम्बा बवुमाची एन्ट्री
11
नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक अनिल परबांनी लक्षात आणून दिली; म्हणाल्या, "मी अनावधानाने..."
12
“पहिल्याच पावसात सरकारचे पितळ उघडे पडले, अपयशाचे खापर पावसावर फोडू नये”; नाना पटोलेंची टीका
13
SL vs IND : भारताविरूद्धच्या मालिकेपूर्वी श्रीलंकेची रणनीती; Sanath Jayasuriya वर सोपवली मोठी जबाबदारी
14
मुंबईसह राज्यात अतिवृष्टी, पावसाची स्थिती काय? देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती
15
विशाल पांडेची बहीणही भडकली, शेअर केली लांबलचक पोस्ट; अरमान मलिकला बाहेर काढण्याची मागणी
16
अंबानींच्या 'अँटिलिया' मधील सोहळ्याला हजेरी लावलेली 'ती' सौंदर्यवती नक्की आहे तरी कोण?
17
गेल्या ४४ वर्षांपासून करण जोहर 'या' गंभीर आजाराचा करतोय सामना, स्वत:च केला खुलासा
18
Sharad Pawar : 'सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरवापर करू नका'; शरद पवारांचे शेतकऱ्यांना आवाहन
19
Mumbai Rains Live Updates: कामावरुन घरी परतणाऱ्यांना दिलासा, मध्य आणि हार्बर रेल्वेसेवा पूर्ववत
20
रांगेत या, 'घेऊन'च जा! बिअर वाटपाचा जाहीर कार्यक्रम, भाजपा खासदाराचं 'झिंगाट' सेलीब्रेशन

"ऑगस्ट महिन्यात कोसळणार मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार’’, इंडिया आघाडीतील बड्या नेत्याचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 6:01 PM

Narendra Modi Government: इंडिया आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या भवितव्याबाबत मोठा दावा केला आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयश आलं होतं. त्यामुळे मोदी आणि भाजपाला एनडीएमधील मित्रपक्षांच्या पाठिंब्याच्या आधारावर सरकार स्थापन करावं लागलं आहे. आता मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर पंतप्रधान बनलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील  सरकारच्या स्थैर्यााबाबत विरोधी पक्षांकडून सातत्याने शंका उपस्थित केली जात आहे. तसेच  हे सरकार फार काळ चालणार नाही, असा दावाही केला जात आहे. दरम्यान, इंडिया आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या भवितव्याबाबत मोठा दावा केला आहे.

केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेलं सरकार खूप कमकुवत असून, ऑगस्ट महिन्यात हे सरकार कोसळेल, असं भाकित लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त पाटणा येथील कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना लालूप्रसाद यादव म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी चांगली झाली आहे. आता आपला पक्ष आणखी मोठी झेप घेईल, असा मला विश्वास आहे. दुसरीकडे केंद्रात सत्तेवर आलेलं मोदी सरकार खूप कमकुवत आहे. तसेच ऑगस्ट महिन्यात हे सरकार कोसळेल. 

यावेळी आरजेडी नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, आमचा पक्ष सत्तेत राहिला आहे. तस्ते बाहेरही राहिलेला आहे. चांगला आणि वाईट काळ पाहिला आहे. मात्र आम्ही आमच्या विचारसरणीशी कधीही तडजोड केलेली नाही. आम्ही आपला संघर्ष सुरू ठेवला आहे. त्याला कधी यश आलंय, तर कधी अपयश आलंय, मात्र आमचे कार्यकर्ते नेहमी अढळ राहिले आहेत. 

आरजेडी बिहारच्या विधानसभेतील मोठा पक्ष बनली आहे. आधी आम्ही जनता दलाचा भाग होतो. नंतर आमचा मार्ग वेगळा झाला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आरजेडीच्या मतांमध्ये ९ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. तर एनडीएची मतं घटली आहेत. तसेच आम्ही मागच्या वेळपेक्षा ९ जागा अधिक जिंकल्या आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल