Punjab Election 2022 The Greate Khali: पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले आहे. WWE सारख्या इंटरनॅशनल फाईटद्वारे आपली ओळख निर्माण करणारा उमटवणारा ग्रेट खली (The Great Khali) उर्फ दलिप सिंग राणा यानं भाजपमध्ये प्रवेश केला. दिलिप सिंग राणा यानं यापूर्वी पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या प्रचारातही भाग घेतला होता.
दलिप सिंह राणा यानं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. अलीकडच्या काळात अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंजाबी अभिनेत्री माही गिलने या आठवड्याच्या सुरुवातीला भाजपमध्ये प्रवेश केला होता. दलिप सिंग राणा हे आतापर्यंत WWF मध्ये भारतातील सर्वात मोठं नाव आहे. दलिप सिंग राणा उर्फ द ग्रेट खलीने या खेळात असताना सर्व प्रमुख चॅम्पियनशिप जिंकल्या. गेल्या काही काळापासून तो डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगणापासून लांब आहे.
यापूर्वीही केलाय प्रचारदलिप सिंग राणा याआधीही राजकारणात दिसला आहे. २०१७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत दलिप सिंग राणा यानं आम आदमी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. त्यानंतर तो आम आदमी पक्षात सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. दलिप सिंग राणानं डब्लूडब्ल्यूईमध्ये जाण्यासाठी पोलिसाची नोकरी सोडली होती. तसंच त्यानं बॉलिवूडमध्येही नशीब आजमावलं आहे.