रमाकांत पाटीललोकमत न्यूज नेटवरमाधापूर (भूज) : १९७१ मधील भारत- पाकिस्तान युद्धात पाकिस्तानी सैन्याने उद्ध्वस्त केलेली भूज विमानतळाची धावपट्टी दुरुस्तीसाठी भारतीय सेनेच्या मदतीसाठी धावून आलेल्या वीरांगना आज राष्ट्र जागरसाठी पुढे आल्या आहेत. मतदान हे देखील राष्ट्रीय कार्य असून प्रत्येकाने आपले कर्तव्य बजवावे, असे आवाहन त्या सर्वांना करीत आहेत. माधापूर गाव अलीकडेच आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत गाव म्हणून चर्चेत आले. याच गावातील जवळपास ३०० महिला १९७१च्या पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात जीवाची पर्वा न करता भारतीय सैन्याच्या मदतीसाठी धावल्या होत्या.
जीवाची पर्वा न करता केली धावपट्टी दुरुस्तपाकिस्तानने भूज विमानतळाची धावपट्टी उद्ध्वस्त केली होती. भारतीय सैन्यदलाचे तेव्हाचे प्रमुख पी.सी. लाल यांनी माधापूर येथील तत्कालीन सरपंचांना विनंती करून धावपट्टी दुरुस्तीसाठी कामगार देण्याची मागणी केली होती. तेव्हा ३०० महिला धावपट्टी दुरुस्तीसाठी पुढे आल्या. बॉम्बगोळ्यांचा वर्षाव सुरू असताना जीवाची पर्वा न करता अवघ्या साडेतीन दिवसांत महिलांनी धावपट्टी दुरुस्त केली हाेती.
या महिलांच्या शौर्याचे तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी, स्व. अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले होते. त्यांच्या गावाच्या प्रवेशद्वारावरच वीरांगना स्मारक उभारलेले आहे.
कणाकणात राष्ट्रभक्तीnआज काही वीरांगना हयात आहेत. त्यातील वालाबेन जेठालाल सिंघानी म्हणतात, आमच्या कणाकणात राष्ट्रभक्तीची भावना आहे. nराष्ट्रप्रेमी व योग्य उमेदवारालाच मतदान करावे. अशाच भावना देबाई दबासिया, लीलबाई भुऱ्या यांनीही व्यक्त केल्या.nसामबेन भंडेली यांनी सांगितले, आम्ही कुठल्या पक्षाचे काम करीत नाही. मात्र, प्रचारासाठी मोठे नेते येतात तेव्हा आम्ही त्यांना देशाची सेवा करा, राष्ट्रभक्ती जिवंत असू द्या.