लैंगिक इच्छा पत्नी नव्हे, तर कुणाकडे करावी? हायकोर्टाचा सवाल, पत्नीचे आरोप फेटाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 05:02 AM2024-10-13T05:02:17+5:302024-10-13T05:04:11+5:30
या तक्रारीत पत्नीकडून सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबातून हुंड्यासाठी छळ केल्याच्या दाव्याचे समर्थन होत नसल्याचे नमूद करत उच्च न्यायालयाचे न्या. कुमार गुप्ता यांनी या प्रकरणातील प्रांजल शुक्ला आणि इतर दोन आरोपींविरोधातील याचिका फेटाळून लावली.
प्रयागराज : सभ्य समाजातील व्यक्ती लैंगिक इच्छा पत्नीकडे नाही तर कोणाकडे व्यक्त करणार? असा सवाल करत इलाहाबाद उच्च न्यायालयाने एका पतीच्या विरोधातील हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप फेटाळून लावला. पतीविरोधात महिलेने केलेले आरोप निराधार व वैयक्तिक वादातून प्रेरित असल्याचे नमूद करत पत्नी पीडित व्यक्तीला कोर्टाने दिलासा दिला.
या तक्रारीत पत्नीकडून सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबातून हुंड्यासाठी छळ केल्याच्या दाव्याचे समर्थन होत नसल्याचे नमूद करत उच्च न्यायालयाचे न्या. कुमार गुप्ता यांनी या प्रकरणातील प्रांजल शुक्ला आणि इतर दोन आरोपींविरोधातील याचिका फेटाळून लावली.
कोर्ट काय म्हणाले?
नैतिकदृष्ट्या सुसंस्कृत समाजातील पुरुषाने लैंगिक इच्छा पत्नीकडे व पत्नीने तिच्या लैंगिक इच्छा पतीकडे व्यक्त केल्या नाहीत तर ते कुठे जाणार? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.
प्रांजल शुक्लाविरोधात पत्नीने हुंड्यासाठी शिवीगाळ व अश्लील चित्रपट पाहणे, अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप केले होते. मात्र, विश्वासार्ह पुराव्यांमधून पत्नीने केलेले आरोप सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
तक्रारी लैंगिक संबंधातील नकाराशी निगडित
तक्रारीतील आरोप जोडप्याच्या लैंगिक संबंधातील नाकाराशी निगडित असून, हुंड्याच्या मागणीशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे न्यायालयाला आढळले. लैंगिक संबंध न ठेवण्याबद्दल वादामुळे ही तक्रार दाखल केली आहे. त्यात हुंड्याच्या मागणीबाबत खोटे आणि बिनबुडाचे आरोप केल्याचे कोर्टाला आढळले.