इंदोर शहरातून एक बातमी येत आहे. हनुमानाच्या मंदिराने आयकर विभागाविरोधातला दावा जिंकला आहे. नोटबंदी काळात या मंदिरात साडेतीन कोटी रुपये दान जमले होते. या रकमेवर आयकर विभागाने कर मागितला होता. ती मागणी अखेर आयकर विभागाने मागे घेतली आहे.
नोटबंदी जाहीर होताच मंदिर प्रशासनाने मंदिराच्या दानपेट्या उघडल्या होत्या. यामध्ये त्यांना साडेतीन कोटी रुपये मिळाले होते. ते त्यांनी बँकेत जमा केले होते. एकदम एवढी रक्कम आल्याने आयकर विभागाच्या रडारवर ती आली होती. यामुळे आयकर विभागाने मंदिर प्रशासनाला नोटीस पाठविली होती. याविरोधात मंदिर प्रशासनाने टॅक्स कमिशनरांकडे अपिल दाखल केले होते.
श्री रणजीत हनुमान मंदिराचे हे प्रकरण आहे. चार वर्षे यावर सुनावणी सुरु होती. ही रक्कम कुठून आली असा सवाल नोटीसमध्ये विचारण्यात आला होता. मंदिर प्रशासनाने भक्तांनी दान केली होती, असे उत्तर दिले. यावर आता आयकर विभागाने नमते घेतले आहे.
मंदिराची नोंदणी नाहीय. तसेच ही चॅरिटेबल ट्रस्टही नाहीय. तसेच आयकर विभागाच्या नियमांतही रजिस्टर नाहीय. यामुळे साडेतीन कोटींवरील डिमांड रद्द करण्यात आली आहे. यामध्ये पेनल्टी आणि व्याजही वेगळे मागण्यात आले होते.