भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं (ISRO) ३६ वनवेब इंटरनेट उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करून आणखी एक इतिहास रचला आहे. भारताचे सर्वात वजनदार लाँच रॉकेट, लाँच व्हेईकल मार्क-III (LVM-III) लो अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये प्रक्षेपित करण्यात आलं. सकाळी ८.३० वाजल्यापासून रॉकेट लाँच करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून याचं प्रक्षेपण करण्यात आलं. फेब्रुवारीमध्ये SSLV-D2/EOS07 मिशनच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर २०२३ मधील इस्रोची ही दुसरी यशस्वी कामगिरी आहे.अधिकृत माहितीनुसार, ४३ मीटर उंच इस्रोच्या रॉकेटनं ब्रिटनच्या एका कंपनीच्या ३६ उपग्रहांना एकत्र घेऊन उड्डाण केलं. LVM3 ने ज्या उपग्रहांसह उड्डाण केलं त्यांचं एकूण वजन ५ हजार ८०५ टन आहे. या मोहिमेला LVM3-M3/OneWeb India-2 असं नाव देण्यात आलं आहे. इस्रोनं ट्वीट करून या मिशनच्या प्रक्षेपणाची माहिती दिली होती.
ISROची अंतराळात मोठी झेप, ३६ उपग्रहांसह सर्वात वजनदार LVM3 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 9:35 AM