लोकशाहीमध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावणाऱ्या राजकीय पक्षांना निवडणूक लढविण्यासह लोकांपर्यंत विविध उपक्रमांमधून पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासते. मात्र हा पैसा पक्ष कुठून गोळा करतात हा प्रश्न आहे. राष्ट्रीय पक्षांकडून भारतीय निवडणूक आयोगाला प्राप्तिकर रिटर्न आणि देणग्यांचे तपशील दिले जातात. यातील अनेक स्त्रोत हे अज्ञात असतात. शिवाय २० हजार रुपयांपेक्षा कमी देणगी देणाऱ्यांची नावे उघड करणे राजकीय पक्षांना बंधनकारक नाही. परिणामी ६५ टक्क्यांपेक्षा अधिकचा निधी अज्ञात स्त्रोतांकडील असून तो कुठून प्राप्त होतो, याचा शोध लागत नाही.
अज्ञात स्रोतांचे आकडे
२००४-०५ ते २०२१-२२ दरम्यान सर्व राष्ट्रीय पक्षांनी अज्ञात स्त्रोतांकडून गोळा केलेला निधी १७,२४९ कोटी रुपये होता. २०२१ ते २०२२ या आर्थिक वर्षात भाजपने अज्ञात स्त्रोतांकडून मिळालेल्या उत्पन्नाची रक्कम ११६१ कोटी रुपये घोषित केली. ती सर्व राष्ट्रीय पक्षांनी घोषित केलेल्या (२१७२ कोटी) तुलनेत ५३.४५ टक्के आहे. तृणमूल काँग्रेसला अज्ञात स्त्रोतांकडून ५२८.०९३ कोटी रुपये मिळाले. - पक्षांनी अज्ञात स्त्रोतांकडून गोळा केलेल्या एकूण २१७२.२३१ कोटींपैकी १८११.९४२५ कोटी म्हणजे ८३.४१४ टक्के उत्पन्न निवडणूक रोख्यांचे असल्याचे जाहीर केलेले आहे.
२०२१-२२ मध्ये पक्षांना मिळालेल्या देणग्यांचे विश्लेषण
आर्थिक वर्ष २००४-०५ ते २०२१-२२ या दरम्यान काँग्रेस आणि एनसीपीने एकूण ४३९८.५१ कोटी रुपयांची कमाई कुपन विक्रीतून केली आहे. ऑडिट रिपोर्टनुसार तृणमूल काँग्रेसकडील एकूण दानाची रक्कम ३८ लाख रुपये आहे. जी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळालेल्या देणग्या वगळून आहे. परंतु पक्षाने २० हजार रुपयांपेक्षा जास्त देणग्यांचा तपशिलात ४३ लाख रुपये दाखवले आहेत. त्यामुळे २०२१-२२ या आर्थिक वर्षातील पक्षाच्या तपशिलांमध्ये तफावत आढळते. सीपीआयने शुल्क, सदस्यत्व शुल्क, पक्षनिधी व निवडणूक निधीतून देणग्या जाहीर केल्या आहेत.
अज्ञात स्त्रोतांकडून प्राप्त उत्पन्न २०२१-२२
भाजप १०३३ १२७ ०० ०.२४ ११६१ तृणमूल काँग्रेस ५२८ ०.०५ ०० ०० ५२८ काँग्रेस २३६ १६ १३५ १ ३८८ सीपीआय(एम) ०० ५५ १० १२ ७८ एनसीपी १४ ०.०५ १.३ ०.०४ १५सीपीआय ०० ०.०५१५ ०० ०.००११ ०.०५२६एनपीईपी ०० ०.०७६ ०० ०० ०.०७६बीएसपी ०० ०० ०० ०० ००एकूण १८११ १९९ १४७ १३ २१७२
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"