जम्मू-काश्मीर आणि काश्मिरी पंडित यांच्यासंदर्भात रिलीज झालेला चित्रपट 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) संदर्भात केलेल्या एका ट्वटवरून केरळकाँग्रेस बॅकफूटवर आली आहे. केरळ विधानसभेतील विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेस नेते वीडी सतीसन सोमवारी म्हणाले, 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटासंदर्भात करण्यात आलेल्या ट्विटसंदर्भात त्यांना कसल्याही प्रकारची माहिती नाही. मात्र, त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन दिले आहे.
काँग्रेसनेते म्हणाले, 'यासंदर्भात आम्हाला काहीही माहीत नाही. केरळ काँग्रेस अथवा केरळ यूडीएफने या चित्रपटावर कधीही आणि कुठल्याही मंचावर, अशा प्रकारच्या मुद्द्यावर चर्चा केलेली नाही. मी संबंधित प्राधिकरणाकडे तपास करेन, चौकशी करेन आणि कारवाई करेन.' खरे तर, केरळ काँग्रेसने एका ट्विटमध्ये, जम्मू-काश्मीरमध्ये 1990-2007 दरम्यान पंडितांपेक्षा अधिक मुस्लीम मारले गेल्याचा दावा केला होता.
केरल काँग्रेसने केलेल्या ट्विटमध्ये म्हण्यात आले होते की, "कश्मिरी पंडितांच्या संदर्भात तथ्य: ते दहशतवादीच होते, ज्यांनी पंडितांना निशाणा बनवले. गेल्या 17 वर्षांत (1990-2007) झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत 399 पंडित मारले गोले आहेत. याच काळात दहशतवाद्यांकडून मारल्या गेलेल्या मुस्लिमांची संख्या 15,000 आहे."