ठाणे : या वर्षीचे अखेरचे खंडग्रास चंद्रग्रहण २८ व २९ ऑक्टोबर रोजी आश्विन पौर्णिमेच्या उत्तर रात्री १:०५ ते २:२३ या वेळेत दिसणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी दिली. ३१ डिसेंबर २०२८ ची वर्ष अखेरची आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या रात्री ‘खग्रास चंद्रग्रहण’ दिसणार आहे, असेही सोमण म्हणाले.
जेव्हा चंद्र पृथ्वीच्या दाट छाये भोवतालच्या विरळ छायेत येतो, तेव्हा छायाकल्प दिसते. जेव्हा चंद्राचा थोडा भाग पृथ्वीच्या दाट छायेमध्ये येतो, तेव्हा ‘खंडग्रास चंद्रग्रहण’ दिसते. जेव्हा संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेमध्ये येते तेव्हा ‘खग्रास चंद्रग्रहण’ दिसते.
सोमण यांच्या माहितीनुसार पुढील १० वर्षांतील चंद्रग्रहणे! छायाकल्प चंद्रग्रहण २५ मार्च २०२४ दिसणार नाही खंडग्रास चंद्रग्रहण १८ सप्टेंबर २०२४ दिसणार नाही खग्रास चंद्रग्रहण १४ मार्च २०२५ दिसणार नाही खग्रास चंद्रग्रहण ७ सप्टेंबर २०२५ दिसेल खग्रास चंद्रग्रहण ३ मार्च २०२६ चंद्र दिसेल खंडग्रास चंद्रग्रहण २८ ॲागस्ट २०२६ दिसणार नाही छायाकल्प चंद्रग्रहण २० फेब्रुवारी २०२७ दिसेल छायाकल्प चंद्रग्रहण १८ जुलै २०२७ दिसेल छायाकल्प चंद्रग्रहण १७ ॲागस्ट २०२७ दिसणार नाही खंडग्रास चंद्रग्रहण १२ जाने. २०२८ दिसणार नाही खंडग्रास चंद्रग्रहण ६ जुलै २०२८ दिसेल खग्रास चंद्रग्रहण ३१ डिसें. २०२८ दिसेल खग्रास चंद्रग्रहण २८ जून २०२९ दिसणार नाही खग्रास चंद्रग्रहण २० डिसें. २०२९ दिसेल खंडग्रास चंद्रग्रहण १५ जून २०३० दिसेल छायाकल्प चंद्रग्रहण ९ डिसेंबर २०३० दिसेल छायाकल्प चंद्रग्रहण ७ मे २०३१ दिसणार नाही छायाकल्प चंद्रग्रहण ५ जून २०३१ दिसणार नाही छायाकल्प चंद्रग्रहण ३० ॲाक्टो. २०३१ दिसणार नाही खग्रास चंद्रग्रहण २५ एप्रिल २०३२ दिसेल खग्रास चंद्रग्रहण १८ ॲाक्टोबर २०३२ दिसेल खग्रास चंद्रग्रहण १४ एप्रिल २०३३ दिसेल खग्रास चंद्रग्रहण ८ ॲाक्टोबर २०३३ दिसेल