लखनौ - उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यामध्ये ट्रॉमा सेंटरमध्ये मेडिकल स्टाफकडून झालेल्या गंभीर चुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे एका रुग्णाचा जीव धोक्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनी आरोग्य कर्मचाऱ्याने आजारी महिलेला इंजेक्शन लावून त्याची सुई महिलेच्या शरीरातच सोडली. या घटनेनंतर सदर आरोग्य कर्मचारी घटनास्थळावरून फरार झाला.
इंजेक्शन दिल्यानंतर तासाभराने सदर महिला वेदनेने तडफडून लागली. त्यानंतर कुटुंबाने रुग्णालयात गोंधळ घातला. रुग्णाची प्रकृती बिघडलेली पाहून डॉक्टर बिघडलेली पाहून डॉक्टर आणि सीएमएमला त्वरित वॉर्डमध्ये बोलावण्यात आले. त्यांनी रुग्णाचा त्वरित एक्सरे काढला. त्यानंतर या महिलेच्या शरीरातून सुई बाहेर काढली.
रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोप केला की, जिल्हा रुग्णालयातील पॅथॉलॉजीमध्येही ट्रेनी आरोग्य कर्मचाऱ्यांचा भरणा आहे. कुठलाही सिनियर टेक्निशियन दिसून येत नाही. त्यांनी आरोप केला की, मनमानी पद्धतीने ट्रेनी आरोग्य कर्मचारी रुग्णांचे रक्त काढतात. जर एकदा रक्त आलं नाही तर दोन ते तीन वेळा सुई टोचली जाते. शरीरातील अनेक ठिकाणांवरून रक्त काढण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांनी सांगितले की, रुग्णाच्या पोटामध्ये केवळ वेदना होत होत्या. मात्र त्याला ऑपरेशन टेबलवर नेले जाते.
या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाचे इंचार्ज सीएमएस डॉक्टर एसएन मिश्रा यांनी माहिती देताना सांगितले की, महिला रुग्णाला इंजेक्शन देण्यात आले होते. मात्र जेव्हा सिरिंज ओढल तेव्हा जॉईंटपासून निडल सुटली. मी पाहिलेली ही पहिलीच केस आहे, कारण सर्वसाधारणपणे असे होत नाही.