रायपूर : लोकसभा निवडणुकांत भाजपप्रणीत एनडीएने बहुमत मिळविले आहे. तसेच ओडिशात भाजपला पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकांत विजय मिळाला आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशातील भाजपच्या यशामध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी जिथे जिथे प्रचारसभा घेतल्या, तेथील भाजप उमेदवार विजयी झाले आहेत.
मुख्यमंत्री विष्णू देव साय यांचा छत्तीसगडमध्ये ९१ टक्के, मध्य प्रदेशात १०० टक्के, ओडिशात ८६ टक्के सक्सेस स्ट्राईक रेट आहे. त्यामुळे साय यांना सुपर स्ट्राइकर सीएम असे लोक म्हणू लागले आहेत. यासंदर्भात विष्णू देव साय म्हणाले की, प्रचंड उष्मा असूनही कार्यकर्त्यांनी न कंटाळता निवडणूक प्रचारात खूप परिश्रम घेतले. भाजपमधील सर्वच नेत्यांनी अतिशय उत्तम कामगिरी बजावली. त्यामुळे लोकसभा निवडणुकांत भाजपला यश मिळाले.
साय यांनी ६४ प्रचारसभा व रोड शो केले. त्यातील १० जागांवर भाजपने विजय मिळविला आहे. विष्णू देव साय यांनी ओदिशातील सात लोकसभा मतदारसंघांमध्ये सभा घेतल्या. त्यातील सहा मतदारसंघांमध्ये भाजप विजयी झाला. मध्य प्रदेशात ज्या चार लोकसभा मतदारसंघांत साय यांनी सभा घेतल्या, त्या सर्व जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. (वा.प्र)