जगदलपूर (छत्तीसगड) : ‘काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपासून गरिबांच्या गरजांकडे दुर्लक्ष केले आणि त्यांच्या वेदना कधीच समजून घेतल्या नाहीत. काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार ही देशाची ओळख बनली होती, मात्र आपण काँग्रेसचा लुटमारीचा परवाना संपवला,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले.
छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील छोटी अंबाल गावात प्रचारसभेत मोदींनी तुष्टीकरणासाठी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार ही देशाची ओळख बनली होती आणि त्याचा सर्वाधिक फटका बसला तो गरिबांनाच. काँग्रेस सरकारच्या काळात दिल्लीतून एक रुपया पाठवला जात होता, तेव्हा फक्त १५ पैसे गावात पोहोचत होते, हे मी म्हणत नाही. काँग्रेसचे पंतप्रधान म्हणाले होते. अरे भाऊ, सांगा कोण होता तो पंजा जो ८५ पैसे मारायचा. देशात काँग्रेसचे सरकार असते तर गरिबांच्या ३४ लाख कोटी रुपयांपैकी २८ लाख कोटी रुपयांची लूट झाली असती, असा दावा मोदी यांनी केला.
कोणाचेही नागरिकत्व रद्द होणार नाही : राजनाथसिंहnनागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे (सीएए)कोणाही भारतीयाचे नागरिकत्व रद्द होणार नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी तामिळनाडूतील नमक्कल येथे प्रचारसभेत सांगितले. ते म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या मुद्यावर विराेधक जाणूनबुजून गोंधळाचे वातावरण निर्माण करत आहे. nभाजपने जनतेला दिलेली वचने पूर्ण केली. अयोध्येत भगवान रामाचे मंदिर बांधण्यात आले. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम आमच्या सरकारने रद्द केले. नागरिकत्व दुरुस्ती कायदा केला.nकोणत्याही धर्मातील माता-भगिनींवर झालेल्या अत्याचाराविरोधात आमचे केंद्र सरकार कठोर कारवाई करेल.