शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

जेवढी चिखलफेक कराल तेवढे कमळ फुलेल, राज्यसभेतही पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 5:59 AM

एक काळ असा होता की सुमारे ६०० सरकारी योजना आणि कार्यक्रमांना गांधी- नेहरू घराण्याची नावे देण्यात आली होती. गांधी कुटुंबातील कोणीही नेहरू हे आडनाव ठेवण्यास का घाबरतो हे समजत नाही. नेहरू आडनाव ठेवायला लाज वाटते का? एवढे महान व्यक्तिमत्त्व तुम्हाला मंजूर नाही. परिवाराला मंजूर नाही आणि तुम्ही आमचा हिशेब मागता, असा टोलाही त्यांनी लगावला.

नवी दिल्ली : अदानी समूहाशी संबंधित प्रकरणावर विरोधी पक्षांकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘आपल्यावर जितकी चिखलफेक होईल तितके कमळ फुलेल,’ अशी टीका विरोधकांवर केली. विरोधकांचे विविध मुद्दे त्यांनी सविस्तर खोडून काढले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर गुरुवारी राज्यसभेत चर्चेला उत्तर देण्यास पंतप्रधानांनी सुरुवात करताच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टीसह काही विरोधी पक्षांचे सदस्य व्यासपीठाजवळ आले आणि घोषणाबाजी करू लागले. सदस्यांच्या घोषणाबाजीवर मोदी म्हणाले, ‘‘त्यांच्याकडे होता चिखल, माझ्याकडे होता गुलाल. ज्याच्याकडे जे होते, ते त्याने उधळले... बरेच झाले. कारण, तुम्ही जितकी चिखलफेक कराल तितके कमळ फुलेल. त्यामुळे कमळ फुलवण्यात प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष त्यांचाही हातभार लागत आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.’’

पंतप्रधानांनी १ तास २५ मिनिटांच्या आपल्या संपूर्ण भाषणात सरकारच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांचा उल्लेख करताना, त्यांच्या यशाची मोजदाद केली आणि काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवरही निशाणा साधला. यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करत आभार प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.

काँग्रेसने ९० वेळा सरकारे पाडलीआज जे विरोधी पक्षात बसले आहेत, त्यांनी राज्यांचे अधिकार नष्ट केले होते. इतिहास पाहा, कोणता पक्ष सत्तेत होता ज्याने कलम ३५६ चा सर्वाधिक दुरुपयोग केला. ९० वेळा निवडून आलेली सरकारे पाडली, असे म्हणत मोदींनी उदाहरणादाखल केरळमधील डावे सरकार, तामिळनाडूमध्ये एमजी रामचंद्रन आणि करुणानिधी सरकार, महाराष्ट्रात शरद पवार सरकार, आंध्र प्रदेशातील एनटी रामाराव सरकार यांचा उल्लेख केला. 

भाजप खासदारांना व्हीपकामकाज सुरू होण्यापूर्वी भाजपने आपल्या सर्व खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी करीत १३ फेब्रु.पर्यंत सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

काँग्रेसने ६० वर्षांत खड्डेच खड्डे केले२०१४ मध्ये जेव्हा आपण देशाचे पंतप्रधान झालो तेव्हा ६० वर्षांत ‘काँग्रेस परिवाराने’ सगळीकडे खड्डेच खड्डे केलेले दिसले. कदाचित त्यांचा हेतू चांगला असेल; पण खड्डेच खड्डे केले होते. त्यामुळे सहा दशके वाया गेली. त्या काळात जगातील छोटे- छोटे देशही यशाच्या शिखरांना स्पर्श करत होते. पुढे सरकत होते, असे मोदी म्हणाले.

नेहरू आडनाव का ठेवत नाहीत?   एक काळ असा होता की सुमारे ६०० सरकारी योजना आणि कार्यक्रमांना गांधी- नेहरू घराण्याची नावे देण्यात आली होती. गांधी कुटुंबातील कोणीही नेहरू हे आडनाव ठेवण्यास का घाबरतो हे समजत नाही. नेहरू आडनाव ठेवायला लाज वाटते का? एवढे महान व्यक्तिमत्त्व तुम्हाला मंजूर नाही. परिवाराला मंजूर नाही आणि तुम्ही आमचा हिशेब मागता, असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजपला बहुमत असताना जेपीसीची भीती का?बुधवारी दुपारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चा मुख्यत: विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अदानी प्रकरणावर लक्ष ठेवण्यासाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीच्या माहितीपटावर सरकारने ‘बंदी’ घातल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. सरकारचे कोविड व्यवस्थापन, महिला आणि वृद्धांचा सन्मान आणि संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व, असे इतर मुद्दे उपस्थित केले गेले.   

मी एकटाच पडतोय सर्वांना भारी... -आपल्या संपूर्ण भाषणात विरोधी पक्षांनी केलेल्या घोषणांना प्रत्युत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की, ‘‘ते एका तासाहून अधिक काळ एकटे बोलत आहेत आणि विरोधकांना घोषणा देण्यासाठी एकमेकांचा आधार घ्यावा लागतो. मी एकटाच अनेकांवर भारी पडतोय... नारे बदलण्यासाठी त्यांना किती कसरत करावी लागत आहे; पण ते माझा आवाज थांबवू शकले नाहीत.’’ 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाcongressकाँग्रेस