पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्यापूर्वी मोरबी पुलाच्या दुरुस्तीचं काम केलेल्या कंपनीच्या नावावर पांढरा पडदा टाकण्यात आला होता. इतकंच नाही तर ज्या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी पूल कोसळून १३० जणांचा मृत्यू झाला होता. या पुलाचे नूतनीकरण ओरेवा ग्रुपने केले होते. पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी हा पूल पांढर्या प्लॅस्टिकनं झाकण्यात आला होता. विरोधक पंतप्रधानांच्या दौऱ्याला इव्हेंट मॅनेजमेंट म्हणत आहेत. त्याचवेळी, स्थानिक सरकारी रुग्णालयालाही प्रशासनाकडून रात्रभर रंगरंगोटी करण्यात आली. नवीन बेड आणि चादरींनी एक वॉर्ड बनविला गेला. जिथं पंतप्रधानांनी काही जखमींना भेट दिली आणि त्यांची विचारपूस देखील केली.
मोरबी पूल दुर्घटनेचा हिरो; स्वतः जखमी झाला पण 60 लोकांचा जीव वाचवला...
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि 'आप'सह सर्व विरोधी पक्ष पंतप्रधान मोदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपवर निशाणा साधत आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सत्तेत असूनही भाजप या घटनेची जबाबदारी का घेत नाही? हा पूल पूर्ण न होता कसा खुला करण्यात आला, असा सवाल विरोधकांनी केला आहे. माध्यमांमधील वृत्तानुसार, सात महिन्यांपूर्वी नूतनीकरणादरम्यान ओरेवा समूहाने मोरबीतील पुलाच्या काही जुन्या केबल्स बदलल्या नाहीत. नूतनीकरणाच्या वेळेपासून हा पूल मार्च महिन्यापासून बंद आहे. गेल्या आठवड्यात तो पुन्हा सुरू करण्यात आला आणि तिकीटांची विक्री सुरू झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तिकिटे १२ ते ५० रुपयांच्या दरम्यान विकली गेली.
रुग्णालयात बसविण्यात आलेले ४ वॉटर कुलर काम करेनापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी मोरबीच्या सरकारी रुग्णालयात रात्रभर चार नवीन वॉटर कुलर बसवण्यात आले, पण त्याच पाणीच नव्हते. कारण कनेक्शन दिलं गेलं नव्हतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॉस्पिटलमध्ये उपस्थित असलेल्या एका महिलेनं सांगितले की, येथे कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध नाही. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी केवळ दिखाऊपणा केला जात आहे.
विरोधकांनी केली पंतप्रधान मोदींवर टीकाकाँग्रेस नेते पवन खेरा यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. "अजूनही अनेक जण सापडलेले नाही. आज अनेक घरांत स्टोव्हही पेटला नाही आणि इथंही तमाशा वाटतोय तुम्हाला?", असं ट्विट पवन खेरा यांनी केलं आहे. यासोबत त्यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. ज्यामध्ये मोरबीच्या रुग्णालयाला रंगकाम केलं जात असल्याचं दिसत आहे. "मोरबीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पेंटिंग केले जात आहे, नवीन टाइल्स लावल्या जात आहेत, का? कारण मोदी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी येत आहेत. आज अनेक घरांमध्ये स्टोव्ह पेटलेला नाही, लोकांचे मृतदेहही सापडले नाहीत, पण कार्यक्रमात कोणतीही कमतरता राहू नये", असं पवन खेरा यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर आम आदमी पक्षही भाजपवर सातत्याने हल्लाबोल करत आहे. भाजपाने दोन दशकं राज्य करूनही गुजरातसाठी काहीही चांगलं केलेलं नाही, असं आम आदमी पक्षानं म्हटलं आहे.