शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

एक्झिट पोलविरोधात कडक कारवाई करण्याची गरज, ...तर गंभीर समस्या; मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 10:20 AM

राजीवकुमार म्हणाले की, मतदान झाल्यानंतर साधारणपणे तिसऱ्या दिवशी मतमोजणी होते. त्यानंतर निवडणुकांची प्रक्रिया संपुष्टात येते...

हरिश गुप्ता -

नवी दिल्ली : हरयाणा विधानसभा निवडणुकांसंदर्भात तयार केलेल्या एक्झिट पोलमागे एक कारस्थान होते असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी थेट वक्तव्य केेले नाही. मात्र चुकीच्या एक्झिट पोलचे समर्थन करण्यासाठी यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला, असे विधान त्यांनी केले. एक्झिट पोलविरोधात कडक कारवाई होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. 

राजीवकुमार म्हणाले की, मतदान झाल्यानंतर साधारणपणे तिसऱ्या दिवशी मतमोजणी होते. त्यानंतर निवडणुकांची प्रक्रिया संपुष्टात येते. मतदान संध्याकाळी ६ वाजता संपते. त्यानंतर जाहीर होणारे एक्झिट पोल तयार करण्यासाठी कोणत्याही शास्त्रीय पद्धतीचा वापर करण्यात येत नाही. त्या पोलमुळे लोक विशिष्ट अपेक्षा मनात धरून बसतात. त्या पूर्ण न झाल्यास सर्व गोष्टींचा विपर्यास होतो. 

ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीप्रसंगी निवडणूक आयोगाने पहिला कल सकाळी ९.३०ला जाहीर केला; पण त्याच्या आधीच सकाळी ८ वाजल्यापासून निवडणूक निकालांबाबतचे आडाखे झळकविण्यात येत होते. याची चौकशी  झाली पाहिजे. अशा प्रकारची विसंगत माहिती प्रसारित केल्यामुळे काही वेळेस गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. अपेक्षा व वास्तव यांच्यातील फरकामुळे कधीकधी निराशा येऊ शकते. त्यामुळे या मुद्द्यावर विचारमंथन व्हायला हवे. मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख निवडणुकीच्या नियमांनुसार पटविली जाईल. तसेच त्यांच्या सांस्कृतिक मूल्यांचा योग्य आदर राखला जाईल, असे राजीवकुमार म्हणाले. हिजाब परिधान केलेल्या महिलांशी मतदान केंद्रांवर होणाऱ्या वादांबाबत त्यांनी हे वक्तव्य केले.

प्रसारमाध्यमांनी आत्मपरीक्षण करावे’मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले की, एक्झिट पोलमुळे वस्तुस्थितीचा विपर्यास होतो. त्याविषयी प्रसारमाध्यमे विशेषत: इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. एक्झिट पोल यावर निवडणूक आयोगाचे नियंत्रण नाही. त्यासाठी वेगळी संस्था अस्तित्वात आहे.

‘शहरातील कमी मतदान ही चिंतेची बाब’शहरी भागांमध्ये तुलनेने कमी मतदान होते. त्याचा मतदान प्रक्रियेवर परिणाम होतो. त्याबद्दल राजीवकुमार यांनी मंगळवारी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये तुलनेने कमी मतदान होते. त्याकडे निवडणूक आयोगाने लक्ष वेधले आहे. मतदारांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.  मतदार जागरूकता वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. आठवड्याच्या अखेरीच्या सुट्यांना जोडून मतदानाचा दिवस आल्यास या सर्व दिवशी सहलीला जाण्याची मानसिकता शहरी मतदारांमध्ये वाढीस लागली आहे. त्याबद्दल राजीवकुमार यांनी चिंता व्यक्त केली.

‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना’- हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे आरोप विरोधक करत आहेत. त्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले की, ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना.’- जम्मू-काश्मीर निवडणुकांबाबत ते म्हणाले की, ‘जमुरियत के जश्न में आपकी शिरकत, दुनिया देखेगी नापाक इरादों के शिकस्त की कहानी’ असा शेर म्हटला. - लोकसभेवेळही राजीवकुमार यांनी ‘अधुरी हसरतों का इल्जाम हर बार हम पर लगाना ठीक नहीं, वफा खुद से नहीं होती, खता इव्हीएम की कहते हो, और बाद में जब परिणाम आता है तो उसपे कायम भी नहीं रहते’ असे म्हटले होते.

टॅग्स :Electionनिवडणूक 2024Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग