एस. पी. सिन्हा -
पाटणा : बिहारमधील जनसुराज पक्षाचे संयोजक आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (पीके) यांनी केंद्रात पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केला. आपल्या चुकीचे परिणाम विरोधकांना भोगावे लागू शकतात, असे त्यांनी सांगितले. केंद्रातील भाजप दक्षिण आणि पूर्व भारतात आपल्या जागा आणि मतांमध्ये अभूतपूर्व वाढ नोंदवेल, असा अंदाज पीके यांनी व्यक्त केला.
कोणत्याही पक्षाला पन्नास टक्के मते मिळणार नाहीतविरोधकांकडे भाजपचा रथ रोखण्यासाठी तीन वेगळ्या आणि वास्तववादी शक्यता होत्या; परंतु आळशीपणा आणि चुकीच्या रणनीतीमुळे त्यांनी संधी गमावली.कोणत्याही पक्षाला पन्नास टक्के मते मिळणार नाहीत आणि २०१९ मध्ये भाजपलाही सुमारे चाळीस टक्के मते मिळाली होती. बंगाल, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू आणि आंध्र या राज्यांमध्ये भाजपला फायदा होईल, तर ओडिशा, पश्चिम बंगालमध्येही भाजप क्रमांक एकचा पक्ष बनणार आहे.
भाजप ४०० जागांचा आकडा गाठू शकत नाही; परंतु २०० जागांपर्यतची मोठी घसरणही होणार नाही, असे ते म्हणाले.
भाजप हरत आहे तर मग...वेगवेगळ्या विचारसरणीचे दोन पक्ष निवडणूक लढवीत असताना काही भांडण होणार हे स्पष्ट आहे. परंतु, मूलभूतपणे मला असे काहीही दिसत नाही की, कोणतेही मोठे आश्चर्यकारक उलटफेर होईल.- एनडीएचा आकडा कमी होणार आहे. मात्र, भाजपला ३०० हून अधिक जागा मिळताना दिसत आहेत. जे लोक म्हणतात की, भाजप हारत आहे, त्यांनी सांगावे की भाजप किती आणि कोणत्या जागा गमावत आहे