'अष्टभुजा' गणरायाचं एकमेव मंदिर; ७०० वर्षांपूर्वीची मूर्ती, अशी आहे अख्यायिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 02:52 PM2023-09-21T14:52:34+5:302023-09-21T14:54:50+5:30

तेजगढ गावातील ही मूर्ती ५०० ते ७०० वर्षांपूर्वीची असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे जमिनीतून ही मूर्ती आल्याची आख्यायिका सांगण्यात येते.

The only temple of Ashtabhuja Ganaraya; A 700-year-old idol, so the legend goes in madhya pradesh | 'अष्टभुजा' गणरायाचं एकमेव मंदिर; ७०० वर्षांपूर्वीची मूर्ती, अशी आहे अख्यायिका

'अष्टभुजा' गणरायाचं एकमेव मंदिर; ७०० वर्षांपूर्वीची मूर्ती, अशी आहे अख्यायिका

googlenewsNext

भोपाळ - देशभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत असून केंद्र सरकारनेही याच शुभ मुहूर्तावर नवीन संसद भवनात प्रवेश केलाय. त्यामुळे, यंदाचे गणपत्ती बाप्पांचे आगमन सरकारसाठीही विशेष बनलंय. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा या राज्यांसह देशभरात गणपती बाप्पांचे जल्लोषात स्वागत झाले असून आता सर्वत्र १० दिवस मोठा उत्सव पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्यात गणपती बाप्पांच्या अनेक प्राचीन मूर्ती आहेत. ज्या स्वयंभू आकर्षित आहेत. येथील तेंदूखेडा तालुक्यातील तेजगढ गावात गणरायाची अष्टभुजा मूर्ती आहे. 

तेजगढ गावातील ही मूर्ती ५०० ते ७०० वर्षांपूर्वीची असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे जमिनीतून ही मूर्ती आल्याची आख्यायिका सांगण्यात येते. गुरैया नदीकिनारी गणपती बाप्पांचे हे मंदिर विराजमान आहे. दररोज बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी येथे भाविक येत असतात. गणेशोत्सव काळात याठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते. 

तेजगढ निवासी महिंद्र दीक्षित यांनी या मूर्तीसंदर्भात माहिती देताना सांगितले की, हे ५०० ते ७०० वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर पूर्णपणे मोडकळीस आले होते. त्यामुळे, २०१३ साली ग्रामस्थांनी मंदिरासाठी समिती बनवून जिर्णोद्धार केला. त्यासाठी, २०१७ मध्ये महायज्ञ करण्यात आले, मंदिराचे नव्याने उद्घाटन करुन भाविकांनी दर्शनाला सुरुवात केली. मंदिरात गर्भगृहही बनवण्यात आले आहे. 

अष्टभूजा गणेश मंदिर म्हणून हे गणपती मंदिर परिसरात प्रसिद्ध आहे. सुरुवातीला आजुबाजूला कुठेही गणेश मंदिर नसल्याने येथे दर्शनासाठी भक्तांची गर्दी होत. मात्र, कालांतराने अनेक ठिकाणी गणेश मंडळे उभारली गेली, घरोघरी बाप्पांचे आगमन झाले आहे, असेही येथील वरिष्ठांनी सांगितले. 

Web Title: The only temple of Ashtabhuja Ganaraya; A 700-year-old idol, so the legend goes in madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.