शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
2
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
3
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
4
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
5
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
7
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
8
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
9
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
10
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
11
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
12
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
13
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
14
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
15
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
16
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
17
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
18
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
19
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
20
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 

विरोधकांनी UPA नाव बदललं, कारण...; श्रीकांत शिंदेंनी स्किम VS स्कॅमची लढाई म्हणत संसदेत सादर केली "ABCD"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 3:37 PM

"यांना वाटते, INDIA नाव केल्याने भारतातील जनता यांच्यासोबत होईल. मात्र, यांनी यूपीए नाव बलले, कारण यांना यूपीए नावाची लाज वाटते."

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. या प्रस्तावावर आजपासून लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेत सहभाग घेत, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. "यांना वाटते, INDIA नाव केल्याने भारतातील जनता यांच्यासोबत होईल. मात्र, यांनी यूपीए नाव बलले, कारण यांना यूपीए नावाची लाज वाटते. कारण यूपीएचे नाव ऐकताच लोकांना घोटाळे, भष्टाचार आठवतात," असे म्हणत शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधा आहे.

शिंदे म्हणाले, "येथे आज चर्चा अविश्वासाची नाही, तर अविश्वासविरोधात जनविश्वासाची आहे. कारण जनविश्वास पंतप्रधान मोदींसोबत आहे. आपल्या विरोधात जनतेनेच 2014 आणि २०२४ मध्ये अविश्वास प्रस्ताव पारित केला आहे. यांनी आपले  नाव इंडिया अलायन्स केले आहे. यांना वाटते, असे केल्याने भारतातील जनता यांच्यासोबत होईल. मात्र, यांनी यूपीए नाव बलले, कारण यांना यूपीए नावाची लाज वाटते. कारण यूपीएचे नाव ऐकताच लोकांना घोटाळे, भष्टाचार आठवतात. मग यात टू जी घोटाळा असो, अगस्ता क्सॅम असो, दहशतवादी हल्ले असो वा रिमोट कंट्रोल वाले सरकार असो. यामुळेच लोकांनी काँग्रेसचा हात सोडून पंतप्रधान मोदीजींकडे देशाची धुरा सोपवली आहे." शिंदे म्हणाले, 'हे  म्हणतात, "नफरत की बाजार, में मोहोब्बतकी दुकान खोल रहा हूं". मला वाटते, एका व्यक्तीच्याविरोधात हे सर्व लोक एकत्रित येत आहेत. ज्यांना कुणी नेता नाही, ज्यांची नियत नाही आणि ज्यांची कसल्याही प्रकारची निती नाही. अशी आघाडी येथे ऊभी झाली आहे. २००४ ते २०१४ पर्यंत यूपीएने देशावर राज्य केलं. मात्र देशाला काय मिळाले? केवळ घोटाळे आणि भष्टाचार. दहशतवादी हल्ले एवढे झाली की, देशातील एकही मोठे शहर या दहशतवादी हल्ल्यापासून सुटले नाही.'

"आडला हरी आणि गाढवाचे पाय धरी" -'INDIA नाव देऊन आपण लोकांची दिशाभूल करू शकतो, असे यांना वाटते. आज यांच्या आघाडीत पीएम इन वेटिंग आहे. कारण या टीमकडे कुणी कर्णधार नाही आणि यांना सामना लढवायचा आहे अन् विश्वचषक जिंकायचा आहे. आमच्या महाराष्ट्रात एक म्हण प्रसिद्ध आहे, "आडला हरी आणि गाढवाचे पाय धरी". मजबुरी लोकांना काय काय करायला भाग पाडते?' असेही शिंदे यावेळी म्हणाले.

स्किम VS स्कॅमची लढाई -येथे केवळ NDA vs INDIA चा सामना नाही, तर स्किम VS स्कॅमची लढाई आहे, असे म्हणत श्रिकांत शिंदे यांनी यावेळी युपीए काळात झालेले भष्टाचार आणि NDA काळातील केली गेलेली विकास कामे अल्फाबेटिकली सांगित ABCD च वाचून दाखवली.

टॅग्स :ParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनShrikant Shindeश्रीकांत शिंदेlok sabhaलोकसभाNo Confidence motionअविश्वास ठराव