शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"
2
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
3
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
4
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
5
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
7
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
8
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
9
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
10
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
11
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
12
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
13
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
14
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
15
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
16
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
17
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
18
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
19
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
20
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा

धक्कादायक... पोलिसांनी मुलीचा मृतदेह रस्त्यावरून ओढत नेला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 12:50 PM

बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप

कालियागंज : पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात एका १७ वर्षीय मुलीवर बलात्कार आणि हत्या केल्यानंतर हिंसाचार उसळला. मुलीचा मृतदेह घेण्यासाठी आलेल्या पोलिसांवर गावकऱ्यांनी दगडफेक केली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांना पाचारण करावे लागले. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडत लाठीचार्जही केला. यानंतर येथे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

मुलीचा मृतदेह ओढत नेण्याची घटना शुक्रवारी घडली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी दिनाजपूरला जाणार आहेत. कानूनगो यांनी ट्वीट केले होते की, मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती, पोलिसांवर मुलीचा मृतदेह रस्त्यावरून ओढत नेत मृतदेहाची विटंबना केल्याचा आरोप आहे. 

पोलिस म्हणतात...nमुलगी बेपत्ता होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तिच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली नाही. त्यानंतर कालियागंज परिसरातील एका कालव्यात मुलीचा मृतदेह तरंगताना आढळला. nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालात विषारी द्रव्य प्राशन केल्याने मृत्यू झाल्याचे कारण समोर आले आहे. nपोलिसांनी सांगितले की, त्यांनी या प्रकरणी एका २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मुलगी आणि आरोपी एकमेकांना ओळखत असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीwest bengalपश्चिम बंगाल